Animate Component

जीवनपट

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जन्म १० जून १९५९ रोजी सौ. सरस्वती पाटील आणि श्री. बच्चू पाटील यांचे अपत्य म्हणून मराठा कुटुंबात झाला. चंद्रकांतदादांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गारगोटी. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईच्या रे रोड येथील प्रभूदास चाळीत गेले. चंद्रकांतदादांचे कुटुंब अल्पभूधारक असल्याने त्यांचे वडील श्री बच्चू पाटील अतिशय कमी वयातच उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थाईक झाले. ते, मुंबईतील कापड गिरणीमध्ये ‘किटली बॉय’ म्हणून काम करत, तर आईदेखील त्याच मिलमध्ये काम करत होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादांचे बालपण अतिशय कष्टप्रद आणि हलाखीचे होते.

कुशल संघटक

सन १९८० ते १९८३ या तीन वर्षांत जळगाव जिल्ह्यात त्यांनी अभाविपचा उत्तम संघटनात्मक विस्तार केला. त्यानंतर ते अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री झाले. १९८८-८९ हे वर्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संघर्षपर्व जाहीर केले. राज्यस्तरापासून शाखा स्तरापर्यंत केवळ महाविद्यालयातील निवडणुकांच नव्हे, तर कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्रिय केले. त्यामुळे अभाविपच्या अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठांचे नेतृत्व/ प्रतिनिधित्व केले. देशभर गाजलेली मुंबई विद्यापीठाची निवडणूक दादांच्या कुशल रणनीतीमुळे अविस्मरणीय ठरली, आणि प्रथम मुंबई विद्यापीठावर अभाविप चे प्राबल्य निर्माण झाले. या संघर्षपर्वातच (चंद्रकांतदादा पाटील) त्यांनी ‘कॅम्पस कल्चर’ हा नवा आयाम अभाविपला दिला. याशिवाय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासोबतच त्यांनी अन्य रचनात्मक कार्यक्रमांद्वारे उपक्रमशीलतेवर खूप भर दिला.

राजकीय नेतृत्व

रा. स्व. संघ आणि संघ परिवारातील सर्व संस्थांमध्ये सर्व निर्णय सामूहिक चिंतन आणि चर्चेतून घेतले जातात. त्यामुळे या प्रक्रियेचे नेतृत्व जबाबदार व्यक्तीकडे असते. अभाविपचे तत्वचिंतक स्वर्गीय प्रा. यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे आणि पुढे मदनदासजी देवी यांनी हे संस्कार विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करणाऱ्या चंद्रकांतदादांवर केले होते. त्यामुळे त्यांची हीच शिकवण राजकीय जीवनातही काम करताना चंद्रकांतदादांनी पक्ष संघटनेतही रुजवली. सन २००४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या आग्रहास्तव चंद्रकांतदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सन २००४ – २००७ या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली.

कर्तव्य

पालकमंत्री

कोथरुड चा लोकसेवक

संकल्प-२०१६

कोल्हापूरमधील स्वयंसिद्धा ही महिला सबलीकरणाची अग्रगण्य संस्था. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामान्य महिला यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. २०१६ मध्ये या संस्थेला महिला प्रशिक्षणासाठी एका प्रोजेक्टरची आणि तत्सम काही उपकरणांची आवश्यकता होती. संस्थेच्या सदस्यांनी चंद्रकांतदादांची भेट घेऊन ही गरज त्यांच्यापुढे मांडली होती. त्यानुसार दादांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एका अनोख्या संकल्पाची घोषणा केली. दादांनी आपल्या वाढदिवसनिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पुष्पगुच्छ नको मला रद्दी द्या! दादांच्या या अनोख्या संकल्पाची सर्वत्र चर्चा झाली. अनेकांना हा प्रश्न पडला की, दादा या रद्दीचं करणार तरी काय? पण आपण काय करतोय, हे दूरदर्शी चंद्रकांतदादांना नेमके ठाऊक होते....

अधिक वाचा

२०२२
२०२३
२०२४
२०१६
२०१७
२०१८
२०१९

Join
#TeamChandrakantPatil

जनसंपर्क कार्यालय
शॉप नं. ७ व ८, ‘आनंद निलय’ को-ऑप. सोसा., कर्वे पुतळ्याजवळ, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कोथरुड, पुणे ४११ ०३८. दूरध्वनी क्र. : ०२०-२५४४०५५५
ई-मेल : bjpofficekothrud@gmail.com