सिंगापूर आणि तैवान या देशांच्या शिष्टमंडमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

मुंबई १३ – महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसाठी तैवान आणि सिंगापूर या देशांच्या शिष्टमंडळाला गुंतवणुकीसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले. आज ओबेरॉय हॉटेल येथे आयोजित सिंगापूर व तैवान येथील वित्तीय गुंतवणूकदारांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्राचा शेतकरी शेतीमध्ये उत्पादन घेतो पण त्याचं उप्तन्न मात्र वाढत नाही, आपण या ठिकाणी कृषि मालावरील प्रक्रिया उद्योग सुरु करावेत जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू शकेल त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महाराष्ट्रात सध्या सातारा व नागपूर या ठिकाणी फूड पार्क उपलब्ध आहेत तशाच प्रकारचे फूड पार्क महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुरु करण्यासाठी व आवश्यक त्या जागा मिळवून देण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कोल्हापूर येथे सर्वतोपरी सुविधा देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले.
भारत हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश आहे त्यामुळे आमचं लक्ष याकडे वेधले आहे; त्यामुळे भारताकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहोत असे सिंगापूर आणि तैवान या देशांच्या शिष्टमंडमंडळाच्या प्रतीनिधीने सांगितले. जर भारतात ही गुंतवणूक झाली तर याचा फायदा भविष्यात दोन्ही देशांना होईल असा आशावाद या वेळी शिष्टमंडळाने व्यक्त केला.