सावली केअर सेंटर करणार रुग्णांच्या निवासाची सोय

मुंबईमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या निवासाची सोय सावली केअर सेंटर करणारआहे. चैतन्य प्रतिष्ठान संचलित सावली केअर सेंटरचे उदघाटन मा. अंजली चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या शुभहस्ते आज सकाळी, महात्मा फुले रोड, नायगांव, दादर इथे झाले. हा प्रकल्प महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना, प्रेरणा व मार्गदर्शनातून आजपासून कार्यान्वित झाला. या कार्यक्रमा प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते.
सावली केअर सेंटर मुंबई मध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या २० रुग्णांची विशेष कक्षामध्ये निवासाची सोय व त्यांच्या सोबत नातेवाईक यांची अशा एकूण ६० व्यक्तींची निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच या अत्याधुनिक व वातानुकूलित सेंटर मध्ये तज्ज्ञ आरोग्य सेवक २४ तास सेवेत असतील. तसेच यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क विकास देशमुख 9769568283