गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन आणि जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या चित्ररथाला कृषीमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

नागपूर : कापसावरील गुलाबी बोंड अळीसंबधात कृषी विभागाने एकात्मिक व्यवस्थापन जनजागृती मोहीम हाती घेतली असून, या मोहीमेचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला माननीय कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज हिरवा झेंड दाखवला. नागपूरमधील देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने गुलाबी बोंड अळीसंबंधात नागपूर जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक तालुक्यात जनजागृती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कशा प्रकारे पिकांची काळजी घ्यावी, याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, कामगंध सापळ्याचे देखील यावेळी वाटप करण्यात येणार आहे.
या मोहिमेचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला माननीय कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी कृषी विभागाचे विभागीय संचालक नारायण सिसोदे, कृषी विभाग उपसचिव घाडगे, जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, कृषी अधिकारी सुरेश मलघडे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, गुणनियंत्रण विभागाचे संचालक इंगळे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.