Chandrakant Patil

Chandrakant Patil
  • Home
  • About
  • Work
  • Media
  • Gallery
  • Blog
  • Download
  • Contact Us
  • Marathi
  • English
Twitter
Tweets by ChDadaPatil
Facebook
Chandrakant Patil
Instagram

chdadapatil

पदवी परीक्षेबद्दल पदवी परीक्षेबद्दल चुकीच्या निर्णयांमुळे  अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकणाऱ्या महाविकासघाडीचा आणि राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जाहीर निषेध !
भाजपाचे ज्येष्ठ ने भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थ मंत्री, प्रभावी राजकारणी आणि फर्डे वक्ते स्व. अरुण जेटली जी यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करून भारताची आर्थिक स्थिती भक्कम करणाऱ्या जेटली जी यांना पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली.
#ArunJaitley
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले महान स्वातंत्र्य सैनिक म्हणजे हुतात्मा शिवराम हरि  राजगुरु. पुण्याच्या पुण्यभूमीत स्वातंत्र्याचे प्रण घेतलेल्या राजगुरु यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व त्याग केले. शहीद चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा महान क्रांतिकारकांच्या सहवासात त्यांनी सशस्त्र उठाव केला . आपल्या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उत्साही असायचे. लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला म्हणून राजगुरु यांनी ब्रिटिश अधिकारी जॉन साँडर्स याला गोळ्या झाडल्या. २३ मार्च, १९३१ साली ते हसत हसत फासाच्या तख्तावर चढले आणि अमर झाले. आज ते भारतातील प्रत्येक युवकासाठी एक प्रेरणास्थान आहेत. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतीवीराला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांची आज पुण्यतिथी. ते दत्तात्रेय परंपरेतील भारतीय गुरू होते. त्यांनी सदैव कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा उपदेश दिला. अशा या ब्रह्मज्ञानी आणि महायोगीस पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
राष्ट्राचे खरे सुप राष्ट्राचे खरे सुपुत्र, @rssorg_official चे समर्पित योद्धा आणि आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान स्व. एकनाथ रानडे जी यांना पुण्यतीथीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. 

कन्याकुमारी स्थित विवेकानंद स्मारकाच्या निर्माणासारख्या असंभव कार्याला पूर्ण करणारे एकनाथ जी,देश आपला सदैव ऋणी राहील.
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे गणेश चतुर्थी. सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षांचा सुवर्ण इतिहास लाभला आहे. विशेष म्हणजे पुणे शहरातून या महान उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. गणपती ही संघटनेची देवता आहे. त्यामुळेच ब्रिटिश काळात टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा आधार घेऊन नागरिकांना प्रेरित करण्याचे कार्य केले. सध्या महाराष्ट्र राज्य अनेक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे राज्यावर आलेलं हे संकट लवकरात लवकर टळू दे आणि सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे, हीच श्री गणेशा चरणी प्रार्थना करतो. 

गणपती बाप्पा मोरया !
भाजपाचे ज्येष्ठ ने भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री  भाऊसाहेब फुंडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांची उणीव आम्हाला नेहमी भासत राहील.
आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यातिथी निमित्त विनम्र अभिवादन.
आपल्या बळीराजाला न आपल्या बळीराजाला निस्वार्थ पणे सोबत करणाऱ्या बैलांना धन्यवाद म्हणायचा आजचा दिवस. 
बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्य दिना न स्वातंत्र्य दिना निमित्ताने माझ्या कोल्हापूर निवासस्थानी ध्वजारोहण केले.
 जय हिंद। जय महाराष्ट्र।

#independencedayindia
Load More... Follow on Instagram

Dada Patil © Copyright 2021