कार्यावर दृष्टिक्षेप

मुंबईतील पत्रकारांसाठी आयोजित मीडिया प्रिमियर लीग 2019 सोहळ्याला मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांची सदिच्छा भेट

मुंबईतील पत्रकारांसाठी मरीन लाइन्स येथील पोलीस जिमखाना स्टेडियम येथे आयोजित मीडिया प्रिमियर लीग 2019 सोहळ्याला मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी काही चेंडूवर फलंदाजी केली.

मुक्ताईनगर, जळगाव येथे विद्यार्थी-विद्यार्थीनी करीता नवीन शासकीय तंत्रनिकेतनचे भूमिपूजन करताना चंद्रकांत (दादा) पाटील

जळगाव येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरु झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फायदा होईल.

मुंबई-गोवा महामार्गादरम्यानच्या कणकवली कोल्हापूर मार्गावरील सुरु असलेल्या पूलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मा. चंद्रकांत पाटील

श्री साई बाबा संस्‍थानच्या वतीने आयोजित ‘झिरोबजेट नैसर्गिक (अध्‍यात्मिक) शेती तसेच विषमुक्त शेती’ प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रसंगी मा. चंद्रकांत पाटील

झिरो बजेट नैसर्गिक व विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले, याविषयी काम करणारे सुभाष पाळेकर यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला ISO मानांकन मिळाल्याबद्दल मा. मंत्री गिरीशजी बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे चंद्रकांत (दादा) पाटील यांनी अभिनंदन केले

अन्न व प्रशासन मंत्री मा. गिरीश बापट यांच्या विभागाला उत्कृष्ट कामगिरी बद्धल ISO प्रमाण पत्र मिळाले त्याबद्धल त्यांचे मा. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.