मी कोथरुड चा लोकसेवक

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा कार्यअहवाल

नोव्हेंबर २०२०

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सर्वत्र निराशाजनक वातावरण होते. त्यातच दिवाळीसारखा सण तोंडावर येऊन ठेपल्याने गरीब कुटुंबामध्ये दिवाळी साजरी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरूड जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2020 दरम्यान 100 रुपये प्रतिकिलो इतक्या नाममात्र दराने दिवाळी फराळ उपलब्ध करुन दिला.

जानेवारी २०२१

कोल्हापूरमधील स्वयंसिद्धा ही महिला सबलीकरणाची अग्रगण्य संस्था. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामान्य महिला यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. २०१६ मध्ये या संस्थेला महिला प्रशिक्षणासाठी एका प्रोजेक्टरची आणि तत्सम काही उपकरणांची आवश्यकता होती. संस्थेच्या सदस्यांनी चंद्रकांतदादांची भेट घेऊन ही गरज त्यांच्यापुढे मांडली होती. त्यानुसार दादांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एका अनोख्या संकल्पाची घोषणा केली. दादांनी आपल्या वाढदिवसनिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पुष्पगुच्छ नको मला रद्दी द्या! दादांच्या या अनोख्या संकल्पाची सर्वत्र चर्चा झाली. अनेकांना हा प्रश्न पडला की, दादा या रद्दीचं करणार तरी काय? पण आपण काय करतोय, हे दूरदर्शी चंद्रकांतदादांना नेमके ठाऊक होते…. त्यांनी वाढदिवसानिमित्त कोल्हापूरातून गोळा केलेली रद्दी विकून मिळालेल्या रक्कमेत स्वत:ची भर टाकून प्रोजेक्टर घेण्याचे ठरवले होते. मात्र, रद्दी विकून उभी राहिलेली रक्कमच इतकी होती की, त्यातूनच प्रोजेक्टर आणि तत्सम उपकरणे खरेदी करून ही रक्कम शिल्लक राहिली.
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारले जावे, हे प्रत्येक रामभक्ताचे स्वप्न. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कायदा करुन मंदीर उभारणीच्या कमाचा श्रीगणेशा माननीय मोदीजींच्या हस्ते करण्यात आला. मंदीर उभारणीचा सर्व इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा, आणि यासाठी कोथरुडमधून मोठ्या प्रमाणात निधी संकलन व्हावे यासाठी कामात किमान एक लाख रु. योगदान देणाऱ्या रामभक्तांना माधव भांडारी लिखित ‘अयोध्या’ पुस्तक भेट देण्याची घोषणा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. आमदार पाटील यांच्या घोषणेला कोथरुडमधील अनेक रामभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्या रामभक्तांनी किमान एक लाखाचा निधी समर्पित केला, त्यांना आयोध्या पुस्तक देऊन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

मार्च २०२१

म्हाडा कॉलनी ही राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडून उभारण्यात येते. त्यामुळे इथे सोयीसुविधा देणे राज्य सरकारचे काम आहे. मात्र, राज्य सरकार त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. राज्य सरकारच्या या उदासिनतेचा फटका प्रभाग क्रमांक 13 मधील मीनाताई ठाकरे सोसायटीमधील रहिवाशांना बसत होता. इथल्या रहिवाशांना अनेक दिवसांपासून नागरीसुविधा उपलब्ध होत नव्हत्या. म्हाडा कॉलनी हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील असल्याने महापालिकेला देखील इथे काहीही करता येत नव्हते. इथल्या नागरिकांची होणारी परवड आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन आपला आमदार निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे म्हाडा कॉलनी मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर कोथरूडमधील सागर कॉलनी येथील डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे वचन आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थानिकांना दिले होते. यासंदर्भात सतत पाठपुरावा केल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले. याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. हा रस्ता आता अतिक्रमण मुक्त होऊन वाहतुकीचा प्रश्न मिटला आहे.

आंबिल ओढ्याच्या परिसरातील पुराचा अनुभव आणि पुण्यातील पर्जन्यमान लक्षात घेता, पुण्यामधील नाल्यांच्या भोवती संरक्षक भिंती बांधणे गरजेचे होते. या कामासाठी राज्य शासनाने पुणे मनपास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. यासाठी आ. पाटील यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री श्री अजित पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील सविस्तर निवेदन दिले. तसेच पत्रकार व बॅंक कर्मचाऱ्यांना फ्रॅंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन त्यांच्या व कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात घेत होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले होते. मात्र, लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना योग्य ती माहिती मिळत नसल्याने लसीकरणासाठी कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. वाढत्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे कोथरुडमधील विविध लसीकरण केंद्रांवर आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगाने मदत केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर भाजपाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत करत होते.

एप्रिल २०२१

कोरोनाची पहिली लाट ओसरुन एप्रिल 2021 मध्ये दुसरी भयंकर लाट सुरु झाली. त्यानंतर रुग्णालये कमी पडू लागली. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, अशा रुग्णांना योग्य पद्धतीने औषधोपचार मिळत नव्हते. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सल्ला तथा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 1500 रुपये किमतीची औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. या उपक्रमाचा 300 रुग्णांना लाभ मिळाला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सर्वत्र ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत होती. त्यामुळे 23 एप्रिल 2021 रोजी कोरोना बाधितांवर उपचारासाठी कोथरुडमधील संजीवनी रुग्णालय येथे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वखर्चातून 40 ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी विवेक व्यासपीठ, रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून गरवारे महाविद्यालय येथे 60 ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी भरीव योगदान दिले.

पुणे शहरातील कोरोनाची सद्य परिस्थिती कळावी यासाठी भाजपा.चे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार पुणे शहर भाजपाच्या माध्मयातून ‘कोरोना डॅशबोर्ड’ कार्यन्वित करण्यात आला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची रोजची संख्या, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आदीबाबत इत्यंभूत माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

कोरोना बाधितांची संख्या पुण्यात वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवताना अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी दमछाक होत होती. रेमडेसीवीर इंजेक्शनची भरमसाठ पैसे घेऊन बाहेर विक्री होत असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे अशा कुटुंबांची ही अडचण दूर करण्यासाठी किमान एक डोस लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्याचा संकल्प आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. त्यानुसार जवळपास 300 रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस तातडीने उपलब्ध करुन दिले.

बाणेरमध्ये कोविड सेंटर अद्यायावत करण्यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करुन दिला. या निधीतून 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर अॅक्सेसरिज, दोन एक्स-रे मशिन्स, दोन ईसीजी मशिन्स यांसह इतर आवश्यक साहित्याची खरेदी करण्यात आली.

कोरोनाच्या काळात इतर रुग्णांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा निर्माण होत होता. त्यामुळे ही बाब लक्षात येताच भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाचे औचित्य साधून पुणे शहर भाजपाच्या माध्यमातून दहा हजार बाटल्या रक्त संकलनाचे आवाहन करण्यात आले. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा हजार बाटल्या रक्त संकलन झाले.

मे २०२१

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर मोठे संकट ओढवले. काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाची देखील आबाळ झाली. त्यामुळे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने केळेवाडी येथील वस्ती भागातील गरीब कुटुंबांसाठी दोन वेळचे जेवण मोफत पुरवले गेले. दुपारी व रात्री मिळून रोज 600 डब्यांचे वाटप केले जात होते. त्यासोबतच लहानग्यांना पौष्टिक आहार मिळावा; यासाठी देखील दूध आणि बिस्किटांचेही वाटप करण्यात येत होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कर्वे शिक्षण संस्था व एस.एन.डी.टी कॉलेज यांसह कोथरुडमध्ये विविध ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्रातील कोरोना बाधितांना आराम मिळावा, यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने पाच हजारांपेक्षा जास्त ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध उपलब्ध करुन देण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांवर उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. मात्र, खासगी तत्वावर चालवण्यात येणाऱ्या केअर सेंटरमध्ये त्याचा तुटवडा होता. त्यामुळे पुण्याला परदेशातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर मिळवेत यासाठी, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आयात शुल्क (इम्पोर्ट ड्यूटी) माफ करुन घेतले. तसेच हे सर्व साहित्य विशेष विमानाने भारतात यावे यासाठी प्रयत्न केले. यामुळे पुण्यासाठी 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणणे शक्य झाले. त्यापैकी 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रोटेशन पद्धतीने कोथरुडमधील कोरोना बांधितांना उपचारासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत होती. त्यामुळे कोरोनामधून बरे झालेल्यांना आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्लाझ्मादानाचे आवाहन केले. या आवाहनानंतर कोथरुडमध्ये 200 पेक्षा अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले.

कोरोना रुग्णांना लवकर आराम मिळावा यासाठी पुण्यात ठिकठिकाणी चालवण्यात येणाऱ्या केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमधील बाधितांसाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगाने आयुष मंत्रालयाच्या आयुष-६४ गोळ्यांचे कोथरुडमध्ये वाटप करण्यात आले.

जून २०२१

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्याची सूचना पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यामुळे लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे नको, वंचितांसाठी लस देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार 1300 जणांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या गंभीर लाटेत लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे नको, रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पानुसार आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूडमधील रिक्षाचालकांना १००० रुपयांच्या सीएनजी कुपन्सचे वाटप केले होते. याचा लाभ दोन हजार रिक्षाचालकांनी घेतला.

  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आनंदाचे क्षण साजरे करु न शकलेल्या वंचित लेकींना आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून वात्सल्य, पतित पावन, क्रिएटिव्ह आणि उज्वल फाउंडेशनच्या माध्यमातून कपड्यांचे वाटप करण्यात आले. जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त मुलींना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

जुलै २०२१

कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपाच्या पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ‘एक हात मदतीचा’ हा रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आर्थिक दुरवस्था ओढावलेल्यांना 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2022 मध्ये किमान दोन महिन्यांची रोजगाराची संधी मिळवून देण्यात आली. या सर्वांना त्यांच्या श्रमाचे मानधन आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून दिले. तसेच, या सर्वांना दोन महिन्यांचा शिधाही उपलब्ध करुन देण्यात आला. या उपक्रमाचा अनेकांना लाभ झाला असून, यापैकी काहीजणांना कायमस्वरुपी रोजगार देखील मिळाला.
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यामुळे कोकणवासियांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या मदतीने कोकणातील चिपळूण आणि महाडमधील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानांनी भरलेले एकूण १५ ट्रक कोकणवासियांसाठी पाठवण्यात आले. मालमत्ता पत्रकासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात 14 जुलै 2021 पासून दर बुधवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. या मदत केंद्राचा कोथरुडमधील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करणं ही काही नवीन बाब नाही, पण समोरच्या व्यक्तीचा सन्मान राखून त्यांना मदत करणं ही जरा निराळी बाब आहे, जी चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कृतीतून करून दाखवली. सर्कशीमधील बेरोजगार कलाकारांना थेट आर्थिक मदत न देता त्यांच्या कलागुणांना वाव देत व्हर्च्युअल सर्कशीच्या माध्यमातून आर्थिक अडचण सोडवण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या कलेच्या आधारे लहान मुलांचे मनोरंजन केले. कोथरुडमधील 10 शाळा आणि 25 सोसायट्यांमधून ही व्हर्च्युअल सर्कस दाखवण्यात आली आहे.

ऑगस्ट २०२१

बाणेर आणि पाषाण भागातही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून सहा बस स्टॉप उभारण्यात आले. तर बाणेर-नणावरे वस्ती येथे ओपन जिम उभारण्यात आली असून, त्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. या तिन्ही कामांसाठी १० लाख रु. खर्च करण्यात आले.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड मतदारसंघातील बाणेरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डॉक्टर आपल्या घरी’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बाणेर, एरंडवणेमधील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि त्याच बरोबर मोफत औषधोपचारही देण्यात आले.
कोरोनामुळे विकासकामांना निधी देणे बंद झाले होते. मात्र, ऑगस्ट 2021 मध्ये निधी उपलब्ध झाल्यानंतर आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून अनेक विकासकामे मंजूर करुन घेतली, त्यापैकी काही कामांचा शुभारंभ 24 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आला. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा- कोथरुड येथे पाण्याची टाकी बसवणे, प्रभाग 8 येथील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात महिलांसाठी शौचालय उभारणे, प्रभाग 13 मध्ये सिटी क्राऊन सोसायटी येथे ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग 13 मधीलच स्नेहा सहकारी संस्था म्हाडा कर्वेनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा येथील शौचालयाचे नूतनीकरण, प्रभाग क्रमांक 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगरमधील गल्ली क्रमांक 1 ते 22 मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग क्रमांक 9 पाषाण मधील पंचशील नगर येथे सामाजिक सभागृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, प्रभाग 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगर येथील निळा झेंडा चौक येथे स्वच्छता गृहावरील विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यासिका बांधणे आदी कामे करण्यात आली. पुणे बेंगलोर महार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कात्रज बाह्यवळण मार्गावर चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र हे काम सुरु असताना चांदणी चौकातील खड्ड्यांची समस्या अतिशय गंभीर झाली होती. या समस्येमुळे कोथरुडमधील नागरिकांसह अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यात ऑगस्ट महिन्यात रात्री उशिरा रस्त्याची पाहाणी करुन आठ दिवसांत खड्डे भरुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करा, केवळ कारणे देऊ नका, असा कडक इशारा देऊन काम पूर्ण करुन घेतले.

सप्टेंबर २०२१

कोथरूड मतदारसंघातील हॅप्पी कॉलनी- गोसावी वस्तीतील नागरिकांना काही समाजकंटकांच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्याची मागणी स्थानिकांकडून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर श्री. पाटील यांनी याचा पाठपुरावा सुरू केला. यासंदर्भात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासोबत बैठक घेऊन, तोडगा काढण्याची मागणी केली होती. तसेच सदर ठिकाणी पोलीस चौकी उभारुन, येथील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे केली होती. याशिवाय सदर पोलीस कर्मचाऱ्यांना लोकसहभागातून वेतन देण्याची तरतूद करु, असेही श्री. पाटील यांनी आयुक्तांना आश्वस्त केले होते. चंद्रकांतदादांच्या आग्रही मागणीमुळे या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात आली असून, याचे लोकार्पण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते 22 सप्टेंबर 2021 रोजी झाले.
लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात वाचन संस्कृतीला चालना मिळाली. त्यामुळे ही संस्कृती अशीच वाढीस लागावी यासाठी कोथरूडमध्ये आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि फ्लिटगार्ड कंपनीच्या माध्यमातून फिरते पुस्तकघर उपक्रम सुरू करण्यात आला. या फिरत्या पुस्तकघराद्वारे दररोज कोथरुडमधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन, वाचनप्रेमी मंडळींना पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आले.

ऑक्टोबर २०२१

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूडमधील वस्ती भागातील स्वच्छतागृहांची साफसफाई आणि नूतनीकरण करण्यात आले. दर आठवड्याला जेट्टी मशिनच्या मदतीने वस्ती भागात स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वस्ती भागातील महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅडचे मशिन, तसेच त्याचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशिन कार्यान्वित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आ. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन, त्या सोडवण्याची ग्वाही दिली. नोव्हेंबर २०२१

नोव्हेंबर २०२१

कोरोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असले, तरी अजूनही समाजाची आर्थिक घडी सावरलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमाला कोथरूडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलो फराळाच्या पदार्थाचे वाटप झाले. त्यामुळे चार हजारांपेक्षा जास्त कुटुंबांची दिवाळी गोड झाली.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सण-समारंभ साजरे करता आले नाहीत.‌ पण यंदा सर्वत्रच दिवाळी अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. हा उत्साह अजून द्विगुणित व्हावा, बालमित्रांना या सणाचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघात ‘सांघिक किल्ले बनवा’ स्पर्धेचं आयोजन केले होते. या स्पर्धेत बालमित्रांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विकासनिधीतून १५ लाखांचा निधी उपलब्ध करुन देऊन, कोथरुडमधील सुतारदरा भागातील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ स्थानिक नगरसेविका छायाताई मारणे, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत, अजय मारणे, यांच्या हस्ते झाला.

कोथरुडमधील वनाझ परिवार प्राथमिक तथा माध्यमिक शाळेसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसहभागातून शाळेची कंपाऊड वॉल रंगवून दिली. त्यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, शाळेला पाण्याची टाकी बांधून देणे आणि मुलांच्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून १५ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला.

डिसेंबर २०२१

कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील स. नं. ८१ येथे आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार विकासनिधीतून ड्रेनेज लाईन टाकणे व सीमाभिंत बांधण्याचे काम करण्यात आले. यासाठी आमदार निधीतून २५ लाख रु. निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १० मधील परमहंस नगर एचडीएफसी बॅंक गल्ली येथे पावसाळी ड्रेनेज लाईन टाकणे आणि गल्ली नंबर ६ येथे ड्रेनेज लाईन टाकणे, चेंबर नूतनीकरण व पावसाळी लाईन तयार करुन देण्यात आली. यासाठी आमदार निधीतून एकूण २० लाख रु. खर्च करण्यात आला.

जानेवारी २०२२

कोथरुड मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अँड्राईड मोबाईल वापरातील अडथळे दूर व्हावे, यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन मोफत मोबाईल ट्रेनिंगसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु केले असून, दर मंगळवार, गुरुवार, शनिवार हे मार्गदर्शन केंद्र सुरु असते. या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार, त्यांच्या बॅचेस तयार करण्यात आले असून, संख्येनुसार नियोजन केले जाते.

असंघटित क्षेत्रातील व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘ई-श्रम कार्ड’ ही योजना देशभर लागू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २५ ते २७ जानेवारी दरम्यान गोसावी वस्ती येथे मोफत ई-श्रम कार्ड व कोविड लसीकरण स्मार्ट कार्ड वाटपासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराची गोसावी वस्तीतील नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीराच्या माध्यमातून १०६ जणांना ई श्रम आणि ३५१ कोविड लसीकरण स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले.

फेब्रुवारी २०२२

गेल्या दोन वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना वैद्यकीय उपचार घेताना, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा कुटुंबांसाठी कोथरूड मतदार संघात मोफत फिरता दवाखाना सुरू केला असून, त्याचे ७ फेब्रुवारी २०२२ रोजी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. हा फिरता दवाखाना दैनंदिन वेळापत्रकानुसार वस्ती भागात जाऊन तिथल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करेल, आणि त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्याचे काम करेल.

कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १० (नवकेतन कॉलनी, धनकुळे चाळ, हमराज चौक, पीएमसी कॉलनी) ड्रेनेज लाईन टाकणे (४० लाख रु.) आणि प्रभाग क्रमांक ११ मधील (सुतारदरा-दत्त मंदीर) येथे रस्त्याच्या काँक्रिटिकरणासाठी (१० लाख रु.) आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून निधी उपलब्ध करुन दिला. या दोन्ही कामांचे भूमिपूजन २० फेब्रुवारी रोजी झाले.

एप्रिल २०२२

पुण्यात जन्मलेला रोल बॉल हा क्रीडा प्रकार जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशनच्या वतीने मैदान विकसित करण्यात येत आहे. या मैदान उभारणीसाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला.

कोथरुड मतदारसंघातील नळस्टॉप चौकातील नव्या उड्डाणपुलामुळे ७५ टक्के वाहतूक सुरळीत झाली असून, केवळ संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाहतूक सुस्थितीत होण्याच्या दृष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर भागाचा अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत कोथरुड मतदारसंघातील नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देऊन वाहतूक कोंडी सुटण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्या.

मे २०२२

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त ६ मे २०२२ रोजी संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यात १०० सेंकंद स्तब्धता पाळून राजर्षींना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी भाजपा महासचिव सी. टी. रवीजी यांच्यासोबत आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे विद्यापीठ परिसरातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्याचबरोबर 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाकर, प्र-कुलगुरू एन. एस उमराणी, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोथरुडसह पुण्यातील महत्त्वांच्या प्रश्नांवर आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी ९ मे २०२२ रोजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकित प्रामुख्याने बावधनमधील कचरा प्रकल्प, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांना पाणीपुरवठा, राम नदीचा समावेश असलेल्या नदी सुधार प्रकल्प, शहरांतील प्रस्तावित उड्डाणापुलांचे नियोजन आदि विषयांवर चर्चा झाली.

महापालिकेत प्रशासक राज आल्यापासून पुणेकरांना विविध अडचणींचा समाना करावा लागत होता. त्यामुळे कोथरुड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी ९ मे २०२२ पासून ‘आमदार जनसंवाद’ उपक्रमास सुरुवात केली. याअंतर्गत विविध सोसायटी आणि वस्ती भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांमध्ये महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातील ड्रेनेज लाईन नादुरुस्त असल्याने, असमान पाणीपुरवठा, रस्ते अशा विविध समस्यांचा समावेश होता. यापैकी जी कामे आमदार निधीतून मंजूर होतील, ती तातडीने पूर्ण करुन देऊ, तसेच, लोकसहभागातूनही कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

कोथरुड विधानसभा मतदारसंघाची कोविड काळानंतरची रेशनिंग कमिटीची पहिली बैठक १० मे २०२२ रोजी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रेशन दुकानातून धान्य वाटपातील अडथळे पुढच्या दहा दिवसांत दूर करुन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी रेशनिंगच्या अधिकाऱ्यांना दिला.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी १४ मे २०२२ रोजी आपल्या जनसंपर्क कार्यालायात जनता दरबार आयोजित करुन, नागरिकांशी संवाद साधला.

पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विकास देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वांना उत्तम सुविधा पुरविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नदीसुधार प्रकल्प आणि बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास ही महत्त्वाचा आहे. त्यासाठी बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास महापालिकेकडून प्रस्तावित असून, त्याचा आढावा आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी १९ मे २०२२ रोजी घेतला. नाट्यगृहाचा पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होणार असल्याने, सौंदर्यात भरच पडणार आहे. मात्र, पुनर्विकासास ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा करुन समन्वयाने तोडगा काढण्याची सूचना आ. पाटील यांनी यावेळी दिली.

कोथरूडमधील सर्व सोसायटी आणि अपार्टमेंटमधील नागरिकांच्या कायदेविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने २२ मे २०२२ रोजी कोथरुडमधील रहिवाशांचे एकत्रिकरण करुन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस सहकार विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रसिद्ध वास्तू विशारद चंद्रशेखर प्रभू, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदींनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा कोथरुडमधील सोसायटी आणि अपार्टमेंटमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कोथरुडमधील नागरिकांना आपले आधार कार्ड अद्ययावत (अपडेट) करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात २४ मे २०२२ पासून ४ जून २०२२ पर्यंत मोफत आधार कार्ड नोंदणी आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष अभियान राबविले. कोथरुडकरांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी याचा लाभ घेऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करुन घेतले. तर काही लहान मुलांची आधारसाठी नोंदणी करण्यात आली.

जून २०२२

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालायात १ ते ४ जून नवीन रेशन कार्ड नाव नोंदणी आणि जुन्या रेशन कार्डमध्ये दुरुस्तीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हजारो कोथरुडकरांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन, रेशन कार्डमधील त्रूटी दूर करण्यासाठी आपापले अर्ज सादर केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे निश्चित केले होते. यावर्षी वृत्तपत्र आणि दूध वितरक, रिक्षा चालक यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी, रेनकोट आणि घरेलू काम करणाऱ्या ताईंना छत्री देऊन, साजरा करण्यात आला. जवळपास सहा हजार वृत्तपत्र आणि दूध वितरक आणि रिक्षाचालकांना रेनकोटचे वाटप केले. तर तीन हजार घरेलू काम करणाऱ्या ताईंना छत्री वाटप करण्यात आले.

जुलै २०२२

मराठवाड्यातील परभणी आणि पालघरसारख्या वनवासी भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अद्विका वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून घोडके दांपत्याने स्वीकारले. या विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसहभागातून विद्यार्थ्यांना सायकल भेट दिल्या. दरवर्षी पावसाळ्यात वस्ती भागातील अनेक नागरिकांना घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. गळक्या छपरामुळे अनेकांना रात्र-रात्र जागून काढावी लागते. त्यामुळे याचा विचार करुन आ. चंद्राकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील वस्ती भागातील नागरिकांच्या घरांवर मोफत ताडपदरी घालून दिली.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा आषाढी वारीला परवानगी मिळाली. त्यामुळे मोठ्या उत्साहात विठूरायाच्या गजरात सर्व वारकरी बांधव पंढरपुरला निघाले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी पुण्यात आगमन झाल्यानंतर आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी या पालख्यांचे स्वागत केले. तसेच, वारकरी बांधवांना खाद्यपदार्थांसह चादरींचे वाटप केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त माननीय देवेंद्रजींनी आरोग्य उपक्रमावर भर देण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालायात १ ते ४ जून दरम्यान नवीन रेशन कार्ड नाव नोंदणी आणि जुन्या रेशन कार्डमध्ये दुरुस्तीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा हजारो कोथरुडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन, रेशन कार्डमधील त्रूटी दूर करण्यासाठी आपापले अर्ज सादर केले होते. त्यापैकी ज्यांचे रेशनकार्डचे काम पूर्ण झाले, त्यांना ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

जून-जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे कोथरुडमधील अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक रस्त्यांवर खड्डे, तर मुख्य चौकातील रस्ते खचले होते. त्यामुळे कोथरुडकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून तातडीने कोथरुडमधील रस्ते दुरुस्त करण्याची सूचना केली. आ. पाटील यांच्या पत्रानंतर तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले.

ऑगस्ट २०२२

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’चा संकल्प केला. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून; स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या जवानांचे स्मरण करण्याचे आवाहन केले होते. कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या घरावर राष्ट्रध्वज लागला पाहिजे, यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील आग्रही असून, त्यांनी आपल्या पुण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास १७ हजार ५०० राष्ट्रध्वज आणि ध्वज लावण्यासाठी ध्वजदंडाचे (काठी) वाटप केले‌. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी आणि सोसायट्यांमध्ये जाऊन राष्ट्रध्वाजाचे वाटप केले.

सप्टेंबर २०२२

शेकडो वर्षांची परंपरा असणारा गणेशोत्सव हा लहान थोरांमध्ये चैतन्य भरतो. बालचमुंना तर गणपती बाप्पा म्हणजे त्यांच्या भावविश्वातील मानबिंदू असतो, त्यांचा सखा-सोबती असतो. बालचमुंच्या याच उत्साहात भर म्हणून शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आयोजित नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगाने इयत्ता 1 ली ते 10 वी च्या मुलांसाठी गणपती रंगविणे स्पर्धा घेण्यात आली होती. या अंतर्गत पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे एकूण चार गट करण्यात आले होते. पहिले बक्षीस 1500 रु, दुसरे बक्षीस 1000 रु, तिसरे बक्षीस 500 रु आणि उत्तेजनार्थसाठी 250 रु अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात आले. या स्पर्धेमध्ये 1000 मुलांनी सहभाग नोंदवला तर 480 मुलांनी प्रत्यक्ष भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण रमणबाग शाळेचे पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार सर, सकाळचे सचिन जोशी, मूर्तिकार योगेश मालुसरे, व्हिजन शाळेच्या कला शिक्षिका सौ.ज्योत्स्ना कुंटे, वैशाली बोडके, कन्याकुमारी आढाव यांनी केले.
मुसळधार पावसामुळे कोथरुडमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक रस्त्यांवरील मलनि:स्सारण चेंबर खचल्याने मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य ओळखून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघात लोकसहभागातून मलनि:स्सारण चेंबर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. खचलेले चेंबर पुन्हा वर उचलून दुरुस्त करुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.

ऑक्टोंबर २०२२

कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जवळपास ५ हजार किलो दिवाळी फराळाचे वाटप यानिमित्ताने करण्यात आले.

दिवाळीनिमित्त बालमित्रांसाठी यंदाही सांघिक किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते. या उपक्रमात ५०० मुलांनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नोव्हेंबर २०२२

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी घरकाम करणाऱ्या ताई, स्वच्छता कर्मचारी, दूध आणि वृत्तपत्र वितरक यांना स्वेटर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. अनेकांनी याचा लाभ घेत यासाठी आपली नाव नोंदणी केली. १ आणि २ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे पाषाण मधील कोकाटे तालीम येथे आणि कोथरुड मधील आशिष गार्डन परिसरात स्वेटरचे वाटप करण्यात आले.

डिसेंबर २०२२

पावसाळ्यात कोथरुडमधील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनवरील झाकणे खचल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी लोकसहभागातून ड्रेनेज लाईन्सवरील झाकणे दुरुस्त करण्याचे काम नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हाती घेतले असून, पहिल्या टप्प्यात आशिष गार्डन परिसरातील खचलेल्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात आली.

जानेवारी २०२३

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग.दि. माडगुळकर यांचे स्मारक पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोथरुडमध्ये उभारण्यात येणार आहे. अडीच वर्षांच्या काळात स्मारकाचे काम मार्गी न लागल्याने पालकमंत्री नात्याने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत स्मारकाच्या जागेची ४ जानेवारी २०२३ रोजी प्रत्यक्ष पाहाणी केली. स्मारकाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी सूचना दिल्या.

पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी ६ जानेवारी २०२३ रोजी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली. या भेटीत उच्च न्यायालयात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी अशी विनंती केली.
पुण्यातील भिडे वाड्याच्या जागेचा वाद लवकर निकाली निघावा आणि येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १८ जानेवारी २०२३ रोजी आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना आहे. त्यामुळे बँकेने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले. नामदार पाटील यांच्या भूमिकेला विजय ढेरे यांनीही सकारत्मक प्रतिसाद देत बँकेचे सर्व सभासद आणि भाडेकरु यांच्याशी चर्चा करुन सहकार्याची भूमिका घेतली.

भारतीय क्रीडाप्रकार नवोदितांमध्ये रुजावा यासाठी शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून कोथरुड मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे 28 आणि 29 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या मल्लखांबपटूंकडून अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. विशेष म्हणजे या स्पर्धेला परदेशी पाहुण्यांसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

फेब्रुवारी २०२३

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी होत होती. सदर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दिली.
कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून समोर आले होते‌. त्यातील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, या रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. या मार्गावरील बहुतांश जागा ही किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्याने, जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास १० फेब्रुवारी २०२२ रोजी मंजुरी मिळाली. हा रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन २० मीटर होणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

मार्च २०२३

कोथरूड मतदारसंघातील सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कर्वेनगर भागातील विविध विकासकामांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ८० लाख आणि २ कोटी ६५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. या सर्व भागातील विकासकामांचे भूमीपूजन रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी झाले‌. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली. या भूमीपूजन कार्यक्रमास भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोथरूड मतदारसंघातील बाणेर भागातील अथश्री सोसायटी ही ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी असून, या सोसायटीला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती. या भेटीत सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी बस स्टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी ही अडचण दूर करण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी दिली होती. याची वचनपूर्ती होत असून, लोकसहभागातून नामदार पाटील यानी ई-व्हेईकल उपलब्ध करून दिले. याचे लोकार्पण रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले. भविष्यात ही कोणतीही अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी श्री पाटील यांनी सर्वांना आश्वस्त केले. यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चाचे प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, अथश्री सोसायटीचे वैशाली वैद्य, विनय केतकर यांच्यासह सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.

कोथरुड मतदारसंघातील सागर कॉलनी शास्त्रीनगर, कर्वेनगर भागातील विविध विकासकामांसाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या आमदार विकास निधीतून १ कोटी ८० लाख आणि २ कोटी ६५ लाख निधी उपलब्ध करुन दिला. या सर्व कामाचे भूमिपूजन १२ मार्च २०२३ रोजी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

पुणेकरांना मिळणारी ४० टक्के करसवलत रद्द करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी सर्वांचीच भावना होती. जनभावनेचा आदर करुन नामदार चंद्रकातंदादा पाटील यांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी १७ मार्च २०२३ रोजी विधिमंडळ अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत ४० टक्के करसवलत रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊन सर्व पुणेकरांना मोठा दिलासा दिला.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण सुतारवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून २४x७ समान पाणीपुरवठा योजना व सूस, म्हाळुंगे येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी १८ मार्च २०२३ रोजी आढावा घेतला. समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोथरुड मतदारासंघात जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून १८ मार्च २०२३ रोजी आयडियल कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भागातील विविध समस्यांची माहिती नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. या समस्या तातडीने मार्गी लावून, नागरिकांना दिलासा दिला. यावेळी पुणेकरांसाठी ४० टक्के करसवलत पुन्हा दिल्याबद्दल सर्व नागरिकांनी नामदार पाटील यांचे आभार मानले.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांसाठी महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा समाना करावा लागू नये, यासाठी या भागात २५ मार्च २०२३ पासून पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला.

कोथरुड मतदारसंघातील घरकाम करणाऱ्या ताईंचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी, त्या काम करत असलेल्या सोसायटी भागांमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेंडिग आणि व्हॅनिशिंग मशिन कार्यन्वित करण्याचे ठरविण्यात आले नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून या उपक्रमातील दुसरे मशीन २६ मार्च २०२६ रोजी बाणेर मधील कम्फर्ट झोन सोसायटीत कार्यन्वित करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून नृत्यवंदना या अभिनव कार्यक्रमाचे २६ मार्च २०२३ रोजी कोथरुडमधील पंडित फार्म्स येथे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ७५० शास्त्रीय नृत्य कलाकारांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमाचा १० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घेतला.

एप्रिल २०२३

पूर्वीच्या काळी लहान मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, यासाठी आजीच्या गोष्टी हे अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचे माध्यम होते. पण कालांतराने त्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये आईची गोष्ट ऐकायला आणि संस्काराचे मोती या अभिनव स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ एप्रिल २०२३ रोजी झाला. या स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धकांना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सतत होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुडमधीस सर्व सावरकरप्रेमींनी ९ एप्रिल २०२३ रोजी सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन आपला निषेध व्यक्त केला. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही या यात्रेत सहभागी होऊन निषेध व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्यवीरांचा आपमान सहन करणार नाही, अशी भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी बौद्ध भन्ते डॉ. राहुल बोधी, भन्ते धम्मसेन बोधी, भन्ते विमल बोधी, भन्ते अनोमादस्सी बोधीस यांना त्रिसरण पंचशील देऊन आपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो, याकरिता मंगलमैत्री दिली. दादांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान घेऊन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

पुणे महापालिकेमार्फत स्वत:च्या मालकीच्या घरात राहात असलेल्यांना घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापूर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरु करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्च २०२३ रोजी अधिवेशन काळात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने १९ मार्च २०२३ रोजीच्या मंत्रिंमडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे ही सवलत पुन्हा पूर्ववत कायम ठेवण्यात आली.

कोथरुड मतदारसंघात पुनर्विकासाला चालना देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत कायदेशीर सल्ला उपक्रम सुरु झाला आहे. या उपक्रमामुळे कोथरुड मतदारसंघातील राजनील सोसायटीचा स्वयंपुनर्विकास होत आहे. पुण्यातील स्वयंपुनर्विकासाचा हा पहिलाच प्रकल्प असून, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर (२२ एप्रिल २०२३) सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सोसायटी धारकांना शुभेच्छा देऊन भविष्यात आपल्या मदतीसाठी सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोथरुडमधील सिग्मा वन, शिल्पा व अभिशिल्पा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी कर्वेनगर येथील यशश्री कॉलनी रहिवासी संघ यांच्या समस्यांबाबत शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. सोसायटीतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न व पार्किंग आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

कोथरुड मतदारसंघातील जयभवानी नगर विठ्ठल मंदिरातील भजनी मंडळाच्या वारकरी बांधवांनी भजन साहित्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. लोकसहभागातून या भजनी मंडळास २६ एप्रिल २०२३ रोजी भजन साहित्य उपलब्ध करुन दिले.

कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम मतदारसंघात राबवत असतात. कोथरुडमधील एपीजे अब्दुल कलाम सभागृहात २९ एप्रिल २०२३ रोजी फिजिओथेरेपी कॅम्प आयोजित केला होता. मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या नेहमीच संपर्कात असतात. आपल्या दैनंदिन कामाच्या गडबडीमुळे नोकरदार वर्गाची वेळेअभावी भेट शक्य होत नाही. त्यामुळे त्याही वर्गाशी सतत संपर्कात राहवे यासाठी ३० एप्रिल २०२३ पासून मतदारसंघातील मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी दर रविवारी ‘थेट भेट व संवाद’ उपक्रम सुरु केला. या उपक्रमातील पहिला कार्यक्रम महात्मा सोसायटीतील टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवादातून झाला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समसस्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने त्याची सुनावणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा ऐतिहासिक शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे औचित्य साधून (३० एप्रिल २०२३) कोथरुडमध्ये एका भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अवयवदान चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या देवदूतांचा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मॉडर्न विकास मंडळाच्या सहयोगाने पुरस्कार देऊन गौरव केला.

मे २०२३

लग्न म्हणजे दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांसाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण. पण या आनंदाच्या क्षणी मुलीच्या आई-वडिलांना लग्न होईपर्यंत मोठी काळजी घ्यावी लागते. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना कर्ज काढून आपल्या लाडक्या लेकीचे लग्न करावे लागते. त्यामुळे यातून काहीसा दिलासा देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मतदरासंघातील प्रत्येक मुलगी ही आपली लेक असल्याचे मानून ‘कन्यादान योजना’ सुरु केली. त्याअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना संसारपयोगी साहित्य देण्यात येत आहे. अनेकांनी याचा लाभ घेतला आहे.

बूथ सशक्तीकरण अभियानाअंतर्गत कोथरुड मतदारसंघातील बूथ क्रमांक २७४ चा आढावा राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी दिनांक ८ मे २०२३ रोजी घेतला. कोथरुड मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी पाहून यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी समाधान व्यक्त केले.
समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. लव्ह जिहाद हा समाजातील ज्वलंत विषय़. या विषयाची दाहकता कोथरुड मतदारसंघातील महिला वर्गाला, विशेष करुन तरुणींना कळावी यासाठी लोकसहभागातून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘द केरला स्टोरीज’ हा चित्रपट मोफत दाखवला. मतदारसंघातील हजारो तरुणींनी हा चित्रपट पाहून आपली उद्विग्न भावना व्यक्त केली. तसेच, अशा प्रवृत्तीला स्वत: देखील बळी पडणार नाही, आणि इतरांनाही पडू देणार नाही, असा संकल्प केला.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपुराव्याला १५ मे २०२३ रोजी यश आले. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या २४x७ च्या पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मतदारसंघातील बाणेरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकासकामांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी १७ मे २०२३ रोजी पाहाणी केली. यात प्रामुख्याने सावरकर उद्यान, ज्युपिटर हॉस्पिटल जवळ सुरु असलेले दोन पूल, कलमाडी शाळेसमोरील स्मार्ट सिटीने विकसित केलेले उद्यान, बालेवाडी-वाकडला जोडणारा सोपानबाग येथील प्रस्तावित रस्ता आदी ठिकाणांची महापालिकेच्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहाणी केली. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना नामदार पाटील यांनी या पाहणी दौऱ्यावेळी केल्या.

कोथरुड मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील अहोरात्र प्रयत्नशील असतात. मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी २१ मे २०२३ रोजी बाणेरमध्ये नवे जनसंपर्क कार्यालय कार्यन्वित करुन जनसेवेसाठी समर्पित केले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणासह कौशल्य आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला आहे. त्यामुळे मतदारसंघातील दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी २५ मे २०२३ रोजी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मतदारसंघातील हजारो मुलांनी या शिबीराचा लाभ घेतला.

कोथरुड मध्ये ख्यातनाम कवी ग.दि.माडगूळकर यांचे स्मारक उभारण्याचे महापालिकेने निश्चित केले होते. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे स्मारकाचे काम रखडले होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे स्मारकाच्या कामाला गती मिळाली असून, २७ मे २०२३ रोजी ग.दि.माडगूळकर यांच्या कुटुंबिंयांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ग.दि.मांच्या कुटुंबियांच्या सूचनेनुसार स्मारकामध्ये योजना आखाव्यात, तसेच, महापालिकेने गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारावे, असे निर्देश ना. पाटील यांनी दिले.

जून २०२३

कोथरुडमधील विविध समस्यांसदर्भात १ जून २०२३ रोजी आयुक्तांसोबत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेतली. पाषाण-सूस रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे काम तातडीने करावे, स्मार्ट सिटी अंतर्गत जनतेच्या दृष्टीने आवश्यक कामांना स्वत: आयुक्तांनी भेट देऊन अडचणी जाणून घ्याव्यात, पाषाण परिसरातील जागेचे प्रश्न सोडवून प्रस्तावित रस्त्यांची कामे सुरु करावीत, तसेच, नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद साधून येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात आदी सूचना यावेळी दिल्या.

आपल्या लोकशाहीचे मंदिर म्हणजे आपल्या संसद भवनाच्या नव्या इमारतीचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या इमारत उभारणीत टाटा प्रोजेक्ट्सचे प्रमुख सल्लागार आणि कोथरुड मतदारसंघाचे सुपुत्र विनायक देशपांडे यांची मोलाची भूमिका होती. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व कोथरुडकरांच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विनायक देशपांडे यांचा ४ जून २०२३ रोजी एका विशेष कार्यक्रमात सत्कार केला.
आपल्या संस्कृतीत साधू-संतांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे, असं मानले जाते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना वारकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. ४ जून रोजी कोथरुड मधील घऱकुल लॉन्स येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात पुण्यातून वारीला जाणाऱ्या दिंड्यांच्या प्रमुखांची पाद्यपूजा केली. तसेच, वारीसाठी आवश्यक साहित्य टाळ-मृदंग, राहूटी (तंबू), रेनकोट यांच्यासह इतर साहित्य भेट म्हणून दिले.

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी एकाच दिवशी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून ५ जून २०२३ रोजी कोथरुडमधील आशिष गार्डन येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) यांच्याकडील १५, कृषि विभाग- १८, ग्रामविकास- २१, अन्न धान्य वितरण (रेशनिंग)- ३००, संजय गांधी निराधार योजना, राज्य परिवहन मंडळ, पुणे मनपा समाजकल्याण विभाग यांचे प्रत्येकी ३४, पंचायत समिती- २०, पुणे मनपा आरोग्य विभाग-२३, महिला व बालकल्याण- ४३, मतदार नोंदणी अधिकारी- ३५, महावितरण- ७, पुणे मनपा- १० याप्रमाणेच उत्पन्न दाखले- ५५२, अधिवास प्रमाणपत्र-८० आणि आधारकार्ड- १८५ अशा एकूण १ हजार ३८१ विविध सेवा आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सेवा, सुशासन पर्वाला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत १५ जून २०२३ रोजी कोथरुडमध्ये लाभार्थी मेळावा संपन्न झाला. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे हजारो लाभार्थी या मेळाव्यास उपस्थित होते.

कोथरुडमधील कर्वे रस्त्यावरील व्यापाऱ्यांची पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे यांच्यासह १९ जून २०२३ रोजी बैठक झाली. यावेळी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वे मध्ये स्थानिक व्यावसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि शहर वाहतूक आयुक्तांना दिले‌. तसेच गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरकुडे उपस्थित होते.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर मधील ७ एव्हेन्यू सोसायटीत घरकाम करणाऱ्या ताईंचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून १९ जून २०२३ रोजी सॅनिटरी पॅड मशिन आणि व्हेडिंग मशिन कार्यन्वित केले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २० जून २०२३ रोजी कोथरूडमध्ये माजी मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांच्या सहयोगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टिफीन बैठकीच्या निमित्ताने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत वैचारिक मेजवानीचा आनंद लुटला.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २५ जून २०२३ रोजी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून कोथरुडमधील प्रबुद्ध नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशभरात सुरु असलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती यावेळी त्यांना दिली.

१५ जून २०२३ पासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे, यासाठी शालेय साहित्याचे वाटप केले.

जुलै २०२३

कोथरुड मतदारसंघातील म्हातोबा दरा इथल्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुस्थितीत नसल्याने, या भागातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. मात्र, यंदा लोकसहभागातून सदर भागातील नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील रस्ता उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोथरुड मतदार संघातील कु. गीता मालुसरे ही उदयोन्मुख जलतरणपटू आहे. अनेक जलतरण स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करुन घवघवीत यश मिळविले आहे. देशासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये विजयदुर्ग परिसरात झालेल्या स्पर्धेत समुद्रात पोहताना विषारी जेली फिशने त्यांच्या हाताला चावा घेतला. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश आले. पण काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी तिच्यावर लोकसहभागातून निधी उभारून यशस्वी शस्त्रक्रिया करुन दिली. २५ जुलै २०२३ रोजी नामदार दादा यांनी तिची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली, तसेच त्यांचे देशासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जावो अशा सदिच्छा दिल्या.

कोथरूड मतदारसंघातील पेठकर साम्राज्य चौक येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी २३ जुलै २०२३ रोजी लोकसहभागातून ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारला असून, त्याचे लोकार्पण केले. हिंदू चालीरीतींनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी म्हणजे दशक्रिया! पुणे शहरात हा विधी मुठा नदीच्या काठावर आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या घाटावर होतो. शहरातील अनेक नागरिक निधन झालेल्या आपल्या नातेवाईकांना मुक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना करतात. पण या घाटावर चोरीच्या घटना घडत असल्याचे इथल्या पुजारी मंडळींनी निदर्शनास आणले. त्यामुळे या घटनांवर चाप बसविण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित केले असून, २३ जुलै २०२३ रोजी त्याचे लोकार्पण केले.

कोथरूड मतदारसंघातील केळेवाडी भागातील जय श्रीराम तालमीच्या नूतनीकरणाची आवश्यकता असल्याची बाब तिथल्या स्थानिकांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तात्काळ लोकसहभागातून या तालमीचे नूतनीकरण करुन कुस्तीगिरांसाठी व्यायामासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून दिले. दिनांक २२ जुलै २०२३ रोजी त्या सर्व साहित्यांचे पूजन करुन, ते सर्व कुस्तीगिरांसाठी उपलब्ध करून दिले.

पाळणाघराचा व्यवसाय करणाच्या अनेक महिला पुणे शहरात आहेत; आणि त्या घराच्या बाहेर सुद्धा न पडता चार पैसे कमावून संसाराला उत्तम हातभार लावत आहेत. त्यामुळे अशा महिलांना बालसंगोपनाचे कार्य अतिशय समर्थपणे करता यावे; यासाठी १७ जुलै रोजी लोकसहभागातून आणि समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरुडमधील आरती पवार यांना आर्थिक मदत करण्यात आली.

कोथरूड मतदारसंघातील आयडियल कॉलनी भागातील नागरिकांशी काही दिवसांपूर्वी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आयडियल सोसायटीचा भाग मोठा असल्याने, महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने संपूर्ण भागात सीसीटीव्ही बसविण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच, या भागात काही अनुचित प्रकारही घडत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. त्यावेळी तातडीने पोलिसांना गस्त वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी गस्त वाढवून भागातील अनुचित प्रकार रोखले. लोकसहभागातून संपूर्ण भागात सीसीटीव्ही कार्यान्वित केले असून, त्याचे लोकार्पण केले. भविष्यातही इथल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी दिली.

विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे समाजाला दिशा देणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांचा ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सन्मान करुन, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाबद्दल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आदरणीय रघुनाथ माशेलकर सरांनी समाधान व्यक्त केले आणि भारतरत्न अटल बिहारी वाजेपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, अशी भावनासुद्धा सरांनी व्यक्त केली. त्यांची ही इच्छा आज्ञा मानून आगामी काळात उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही दिली. यावेळी – – – – यांचा सत्कार ना. चंद्रकांतदादांनी केली.

ऑगस्ट २०२३

कोथरुडमधील आनंदनगर पार्क सोसायटी पौड रोड येथील २३ गृहनिर्माण संस्थाचा २५ वर्षाहून अधिक काळ प्रलंबित कन्व्हेयन्स संदर्भातील प्रश्न मार्गी लावला. या अनुषंगाने संस्थेच्या सदस्यांनी २४ ऑगस्ट २०२३ रोजी भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केले होते. त्यानंतर तातडीने पुणे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोसायटीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

भजन म्हणजे नादब्रह्माशी एकरुपत्व, सप्तसुरांची आळवणी, परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, चिंतन आणि एकाग्रता! परमेश्वराच्या दिव्यशक्तीच्या चिंतनात अबालवृद्ध, महिलावर्ग नेहमीच तल्लीन होत असतो. या चिंतनात आपलाही सहभाग असावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठीच कोथरुडमधील अनेक भजनी मंडळांना मदत देखील केली आहे. मतदारसंघातील पाषाणमधील कैवल्य महिला भजनी मंडळास २४ ऑगस्ट २०२३ रोजी पेटी आणि वीणा देऊन सेवा केली.
प्रेम, माया आणि आपुलकी, आपल्या-परक्याचा भेदभाव न करता सर्वांसाठी, तसंच समाजातील दुर्लक्षित घटकांप्रति ज्यांच्या मनात आपुलकीची भावना आहे त्यांना “जिव्हाळा” असे म्हणतात. समाजातील दुर्लक्षित घटकातील, कमी उत्पन्न गटातील, निराधार व एकल पालक असणारी मुलं शिक्षणापासून कायम वंचित राहतात. त्यांना शिक्षण देणं, निराधार – गरजू व एकल पालक असणाऱ्या मुलींकरिता संपूर्णपणे मोफत वसतिगृह चालवणं व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, ही ‘जिव्हाळा फाउंडेशन’ची उद्दिष्टं आहेत. अशा या संस्थेस आज लोकसहभागातून १३ ऑगस्ट २०२३ रोजी स्कूलबस उपलब्ध करून दिली. श्रीफळ वाढवून त्याचे लोकार्पण केले.

सप्टेंबर २०२३

मोदी सरकार भारतीयांमध्ये असणाऱ्या क्रीडागुणांना हेरून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहे. यासाठी ‘खेलो इंडिया’ सारख्या अनेक स्पर्धा देखील राबविण्यात आल्या आहेत. याच आदर्शाचे पालन करून नवोदितांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी लोकसहभागातून कोथरुड मतदारसंघातील पेठकर साम्राज्य सोसायटीतील रहिवाशांसाठी टेबल टेनिस कोर्ट उपलब्ध करून दिले आहे.

कोथरुडमधील कलासक्त कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा प्रसिद्ध सिनेअभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला. या स्पर्धेत कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला होता. त्यामुळे पारितोषिक वितरण सोहळ्यातील जल्लोष आणि उत्साह मनाला वेगळेच समाधान देणारे होता.
श्रावण महिना म्हणजे सर्व सणांचा राजा! आपल्या हिंदू संस्कृतीत या महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळागौर हा त्यातीलच एक भाग. यानिमित्ताने भगिनी एकत्र येऊन, पारंपरिक पद्धतीने हे व्रत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. यावेळी खाण्यापिण्याची मोठी रेलचेल असते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात हा उत्सव प्रत्येकालाच साजरा करायला मिळत नाही, त्यामुळे माझ्या कोथरुड मतदारसंघात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत कोथरुडमधील माझ्या भगिनींसाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा १४ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

पुण्यातील भवानी पेठेतील वीर दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल ते लेह मोहिमेवर असताना प्रवासादरम्यान शहीद झाले. १५ सप्टेंबर २०२३ रोजी भवानी पेठेत शहीद दिलीप ओझरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ओझरकर कुटुंबियांना तातडीने पाच लाखांच्या मदतीसह मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. १८ सप्टेंबर रोजी ओझरकर कुटुंबियांना पाच लाखाची मदत सुपूर्द करण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली “मेरी माटी मेरा देश” म्हणजेच “माझी माती माझा देश” अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत देशभरातून माती कलशात संकलित करुन अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत २६ सप्टेबर २०२३ रोजी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती स्मारकाची माती संकलित करुन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांना हा कलश सुपूर्द करण्यात आला.‌ यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहर म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी. याच राजधानीचे माहेरघर असलेल्या कोथरुडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोथरुडमधील विविध सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असून, या कार्यक्रमांचा सोसायटीतील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजणच लाभ घेतला.

पुण्यातील कर्वे नगर येथील श्री. अजीम नाईकवडी यांना १५ सप्टेंबर २०२३ रोजी शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून दिली, याचे समाधान वाटते. आपले सरकार सर्वसामान्यांच्या आणि गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यरत असल्याचे पाहून आनंद वाटतो.

महिला स्वावलंबी झाल्यास स्वतःच्या कुटुंबासह समाजाचाही विकास घडवू शकतात. म्हणून, कोथरुडमधील माता भगिनी उद्योजक क्षेत्रात स्वावलंबी व्हाव्या यासाठी लोकसहभागातून महिला स्वावलंबन योजना कार्यान्वित केली असून; समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरुडमधील महालक्ष्मी महिला बचत गटाला १ सप्टेंबर २०२३ रोजी इडली पीठ बनविण्याचे मशीन उपलब्ध करून दिले. या भेटीद्वारे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर कोथरुडमधील माझ्या भगिनींना एकप्रकारे ओवाळणी दिली.

ऑक्टोबर २०२३

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मातृभूमीला वंदन करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा दिला. याच संकल्पाच्या माध्यमातून देशभरातील माती संकलित करून राजधानी दिल्लीत अमृतवाटिका साकारण्यात येणार आहे. याचसाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून संकलित झालेली माती घेऊन २९ ऑक्टोबर २०२३ सर्व कार्यकर्ते राजधानी दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी पुणे रेल्वे स्थानकावर सर्व कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा २९ ऑक्टोबर २०२३ रोजीचा ‘मन की बात’ कार्यक्रम नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कोथरुड मंडल कार्यालयात विश्वकर्मा लाभार्थ्यांसोबत ऐकला. यावेळी सर्व देशवासीयांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना, व्होकल फॉर लोकलचा मंत्र माननीय मोदीजींनी दिला‌. तसेच भारतीय वस्तूंची खरेदी करण्याचं आवाहन मोदीजींनी देशवासीयांना केले‌. याचसोबत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’चे अमृत कलश राजधानी दिल्लीत पोहोचत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

केवळ गृहिणी ही कोणत्याही महिलेची ओळख नसावी, त्या उद्यमशील असाव्यात हा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून कोथरुडमधील माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावेत, यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पाषाणमध्ये दीपावली महोत्सवाचे आयोजन

कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्यांसंदर्भात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा, अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, आवश्यकता असेल तिथे आमदार निधी देखील वापरावा‌‌, असेही यावेळी सूचित केले. या बैठकीस पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, परिमंडळ २ चे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ ३ च्या उपायुक्त आशा राऊत, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय अधिकारी राजेश गुर्रम, मलनि:स्सारण अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे यांच्यासह स्वप्नशिल्प, तारा रेसिडेन्सी यांसह १६ सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. केले होते. या महोत्सवात अनेक महिलांनी दिवाळीसाठी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली होती. या महोत्सवास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट देऊन माता भगिनींनी तयार केलेली उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले.

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूने जगात थैमान घातले असता एकीकडे भारतीय शास्त्रज्ञांनी विषाणूला नष्ट करण्यासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. या गंभीर परिस्थितीतही भारताने देश विदेशात लस पुरवठा करून आपली क्षमता जगाला दाखवून दिली. अशा या लसनिर्मितीचा प्रवास सर्वांना समजावा यासाठी मतदारसंघातील बाणेर बालेवाडी पाषाण भागातील नागरिकांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते. या सिनेमाला बाणेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा, अभयअरण्ये व राष्ट्रीय उद्याने यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी भूगोल तज्ज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी आधुनिक पद्धतीने नकाशे तयार केले असून, एरंडवणे येथील शिशु विहार शाळेत लोकसहभागातून २३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात विविध शाळांच्या शिक्षकांना हे प्रदान केले. विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाची आवड निर्माण व्हावी, त्याबद्दल उत्सुकता निर्माण होऊन ज्ञानार्जन होण्यासाठी हे नकाशे उपयोगी ठरतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे सुरेशजींनी तयार केलेले इतरही विषयांवरील नकाशे शाळांमध्ये उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

कोथरुड मतदारसंघातील सर्वांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे मतदारसंघातील शास्त्रीनगर भागात ड्रेनेज लाईनची समस्या बिकट झाली होती. ड्रेनेज लाईनच्या समस्येमुळे इथले नागरिक हैराण झाले होते. याची माहिती मिळताच नामदार पाटील यांनी तात्काळ लोकसहभागातून २५ लाख रुपये खर्च करून भागातील ड्रेनेज लाईन बदलून दिली. त्याचे लोकार्पण १५ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले.

कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी प्रयत्नशील राहणे हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आपले आद्य कर्तव्य समजतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना अधिकाधिक चांगले उपचार मिळावेत, यासाठी मागील वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. यामधून संकलित निधीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाला साथ देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या कॅशलेस तिकीट सुविधेचा १ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमपीएमएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला. सध्याच्या घडीला कॅशलेस सुविधा सहज आणि सोपी आहे म्हणून देशभरात सर्वत्र कॅशलेसचा वापर होतो. त्यामुळे आगामी काळात पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचेही एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.  १४७). माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छतेच्या जागृकतेविषयी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारतासाठी प्रचंड उत्साह दाखवला होता. यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना मन की बातच्या 105 व्या भागात 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार भाजपा कोथरुड मंडल दक्षिणेच्या वतीने म्हातोबानगर येथे आयोजित स्वच्छता उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान केले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपवावी; यासाठी मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने लवकर मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल 1 ऑक्टोबर रोजी मंडळाच्या सर्व‌ पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तसेच, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा पुढाकार भविष्यात पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

नोव्हेंबर २०२३

कोथरूडकरांना आनंदी पाहणे हा माझा संकल्प आहे. याच संकल्पाचा भाग म्हणून कोथरूवासीयांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करण्यासाठी आजतागायत विविध उपक्रम राबविले आहेत. नाटक ही अशी अजरामर कला आहे, ज्याद्वारे रसिकप्रेरक्षकांना निखळ आनंद मिळतो. म्हणून, कोथरुडकरांचे मनोरंजन व्हावे, आनंद मिळावा यासाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित तसेच सरगम प्रकाशित “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बुधवार, दि २२ नोव्हेंबर २०२३ रोजी बाणेर मधील बंटारा भवन येथे आज आयोजित केला होता. या प्रयोगास बाणेरमधील रसिकप्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शहरी झगमगाटापासून दूर जाऊन कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य ठिकाणी काही काळ व्यतीत करावा असं प्रत्येक ज्येष्ठ पुणेकर नागरिकांना वाटत असतं. परंतु हाताशी असलेल्या शिदोरीमुळे प्रत्येकालाच उतारवयात हा सुखद अनुभव घेता येतो असं नाही. त्यामुळे निसर्गाचं हे विहंगम रुप प्रत्येकाला अनुभवता यावं यासाठी लोकसहभागातून पुण्यातील चांदणी चौकापासून चार किमी अंतरावर भूगाव मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्गछाया’ हा उपक्रम सुरू होत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील ज्येष्ठांना निसर्गाचा गोडवा अनुभवता येणार आहे. मलाही या निसर्गछायेचा मोह न आवरल्याने आज मी सपत्नीक येथे वास्तव्यास असून येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला.

कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो.‌ यासाठी विविध वैद्यकीय उपक्रम सातत्याने राबवित आहे. आज कोथरुड मधील ऋषिकेश गोसावी, परशुराम चलवादी, विलास शिंदे, सविता वसंत कोमकर आणि शंकर किसन पवार यांच्यावर कर्करोगावर उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील टिपलेला आनंद अत्यंत समाधानकारक होता.

दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. मात्र, २०२३ मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची दिवाळी वंचितांसोबत साजरी करण्याचा संकल्प केला. या अंतर्गत राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्टच्या माध्यमातून ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ईशाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांसोबत साजरा केली. खरंतर ईर्शाळवाडीच्या या मुलांच्या जीवनात यंदाच्या दिवाळीत दु:खाची किनार आहे. पण, फराळ आणि खेळाचे साहित्यच्या माध्यमातून या मुलांचे दुःख कमी करण्याची संधी मिळाली.

राज्यातील प्रत्येक नागरिकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात आला. यात १ किलोग्राम साखर, १ लिटर खाद्यतेल, अर्धा किलोग्रॅम चणाडाळ, अर्धा किलोग्रॅम रवा यांच्याबरोबरच आता अर्धा किलोग्रॅम पोहे आणि अर्धा किलोग्रॅम मैदा या जिन्नसांचा समावेश करण्यात होता. कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर भागातील दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी रेशन धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटप केले.

कोथरुड मधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला. या अंतर्गत बाणेर (६ नोव्हेंबर), कोथरुड (७ आणि ८ नोव्हेंबर), कसबा (७ नोव्हेंबर) रोजी फराळ उपलब्ध करुन दिला. या उपक्रमास कोथरुड आणि कसबावासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामदार पाटील यांच्या माध्यमातून जवळपास १५ हजार किलोपेक्षा जास्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची महानगर गॅसची मागणी पूर्ण करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. या उपलब्धीसाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन महापालिकेची जागा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने बाणेरमधील टियारा व्हिवा सोसायटी मधील अम्युनिटी स्पेस येथे जागा उपलब्ध करून दिल्याने ही प्रणाली कार्यान्वित झाली. यामुळे बाणेर पश्चिम, सूस-म्हाळुंगे आणि पाषाण मधील पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली. बाणेरमधील युथिका सोसायटी येथे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजन करुन प्रातिनिधिक स्वरुपात लोकार्पण केले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत तयार झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांना अक्षरशः जेरीस आणले. केवळ फंदफितुरीमुळे त्यांना ब्रिटिंशांनी पकडून, पुण्यातील आताच्या सीआयडी कार्यालय येथे ठेवले. या तुरुंगवासातही ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या अनन्वित अत्याचार केले. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडल्याने एडन येथील कारावासातच त्यांचा मृत्यू झाला. वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य तरुण पिढीला समजावे यासाठी वासुदेव फडके ज्या कारागृहात होते, त्याचे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसहभागातून सुशोभीकरण केले. यात प्रामुख्याने वासुदेव फडके यांचे जीवनचरित्र इथे साकारण्यात आले आहे. या सर्व सुशोभीकरणाच्या कामाचे नामदार पाटील यांनी ४ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकार्पण करुन वासुदेव फडके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

महिलांच्या प्रगतीमुळेच देशाची प्रगती होत असून ही प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. म्हणून देशातील मुलींचा शिक्षण क्षेत्रातील आकडा वाढता असावा, त्यांनी प्रगती करावी यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” सारखा कार्यक्रम मोदी सरकारने संपूर्ण देशभरात यशस्वीरीत्या राबविला आहे. यानुषंगानेच कोथरुडमधील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे असा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा नेहमीच आग्रह असतो. यासाठी शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशी असतात‌. याचाच भाग म्ह्णून, अतिशय होतकरू पण श्रवण समस्येमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या कोथरुड मधील केळेवाडी भागात राहणाऱ्या संस्कृती भंडारी या ११ वर्षीय विद्यार्थ्यांनीला १ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकसहभागातून श्रवणयंत्र उपलब्ध करून दिली. हे श्रवणयंत्र मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच समाधान देणारा होता.

डिसेंबर २०२३

कोथरुडमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी येणाऱ्या कायदेविषयक समस्या तातडीने सोडविण्यासाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत सल्ला उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. याचा लाभ अनेकांना होत असून, नुकताच कोथरुडमधील निर्मल रेसिडेन्सी येथील नागरिकांना माझ्या उपक्रमाचा लाभ झाला आहे. निर्मल रेसिडेन्सी या सोसायटीमधील रहिवाशांना जलदगतीने प्रॉपर्टी कार्ड मिळाले, याचा मलाही आनंद होत आहे. भविष्यातही कोथरुडकरांच्या सेवेसाठी असाच सदैव तत्पर राहण्याचा माझा संकल्प राहणार आहे.
दान प्रेमाचे, दान मायेचे! लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि पवित्र क्षण! ज्यामध्ये केवळ दोन व्यक्ती पती-पत्नी म्हणून एकत्र येतात असं नाही; तर दोन कुटुंबांचे देखील ऋणानुबंध जुळले जातात. अशा या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना खर्चाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या घरी लग्न ठरले की आपल्या मुलीची सन्मानाने पाठवणी व्हावी, म्हणून प्रत्येक बाप झटत असतो. त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कर्त्या पुरुषाची त्रेधातिरपीट होते. ही त्रेधातिरपीट टळावी; आणि आपल्या लेकीची आनंदाने पाठवणी करता यावी असा माझा आग्रह असतो. कोथरुड मधील प्रत्येक मुलगी ही माझीच लेक आहे, त्यामुळे तिची सन्मानाने पाठवणी व्हावी, यासाठी गेल्या चार वर्षांपासून कन्यादान उपक्रम राबवित आहे. आज या उपक्रमाच्या माध्यमातून किष्किंधा नगर मधील मोनाली कदम आणि कर्वेनगर मधील आरती माकवान हिला तिच्या वैवाहिक जीवनात आवश्यक सर्व वस्तू देऊन तिचा सन्मान केला. यावेळी या दोन्ही लेकींच्या चेहऱ्यावरील आनंद कृतार्थ करणारा होता.

कर्तव्य तत्पर कन्यादान ! बापाचं राजासारखं मन अधोरेखित करणारं उत्तम उदाहरण म्हणजे कन्यादान ! कन्यादानासारखे दुसरे पुण्य नाही. त्यामुळे मतदारसंघातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील माझ्या लेकींचे वैवाहिक जीवन सुखी, समृद्ध आणि आनंददायी राहो, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. माझ्या कोथरूडमधील भाग्यश्री मुळीक आणि अक्षता मुरमुरे या दोन लेकींच्या विवाह निमित्त त्यांना जीवनामध्ये आवश्यक वस्तू भेट दिल्या.

मनोरंजनातून ज्ञानार्जनाकडे! देशाच्या वैभवशाली इतिहासातील एक सुवर्णपान म्हणजे आचार्य चाणक्य! आचार्य चाणक्य हे आपल्या देशातील एक महान विद्वान आणि कुशल रणनीतिकार होते. त्यांची धोरणे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.त्यांच्या धोरणांद्वारे, एखादी व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात धर्म-अधर्म, कर्म, पाप-पुण्य याशिवाय यशाचे अनेक मंत्र सांगितले आहेत. पुणेकरांना आचार्य चाणक्य यांचे तत्वज्ञान समजावे यासाठी मनोज जोशी यांच्या ‘चाणक्य’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. आजच्या दोन्ही प्रयोगाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. नाट्य प्रयोगांमुळे आपल्या देशाच्या वैभवशाली परंपरेची माहिती तरुण पिढिपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल! वास्तविक, पुणेकरांचे नाट्य प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथील चाहत्यांनी नेहमीच दर्जेदार नाटकांना डोक्‍यावर घेतलेले आहे. अशा नाटकांची मेजवानी पुणेकरांना मिळावी; यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी मी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. यापूर्वी कोथरुड मतदारसंघातील बाणेरमधील नागरिकांसाठी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट ‘या नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्याला बाणेरकरांनीही उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता.

आरोग्याची वारी, आळंदीच्या दारी! संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या वारकरी बांधवांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आरोग्य सेवा शिबीर आयोजित केले आहे. या माध्यमातून वारकरी बांधवांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांचे रिपोर्ट दिले जात आहेत. या आरोग्य सेवेचा असंख्य वारकरी बांधव लाभ घेत आहेत. आपले वारकरी बांधव विठू नामाच्या जयघोषात तहान भूक हरपून तल्लीन होत दर वर्षी आळंदीला येत असतात. कितीही संकटे आली तरी वारी कधी चुकवत नाहीत. अशा या निष्ठावंत वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे म्हणजे माझेच भाग्यच आहे असे समजतो.

आरोग्यम् धन संपदा ! देशातील गोरगरीबांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विविध योजना राबविल्या जात आहेत. आदरणीय मोदीजी सर्वसामान्यांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांबाबत संवेदनशील आहेत. याच आदर्शाचे पालन करून माझ्या कोथरुडमधील दोन रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. मंगेश कुडले आणि सुलोचना दळवी यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाखाची मदत मिळवून दिली. या दोघांनाही उत्तमोत्तम उपचार मिळावेत, आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे ही प्रार्थना! यापुढे देखील माझ्या कोथरूडमधील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि वाचनप्रेमी मंडळींचे शहर आहे. पुण्यात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ यांच्यावतीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायं. ८ या वेळेत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवात अधिकाधिक वाचकांनी भेट देऊन खरेदी करावी, यासाठी कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला १०० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहे. तरी, या पुस्तक प्रदर्शनाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर भेट द्यावी असे मी आवाहन करतो.

कोथरुडकरांना सुकर आयुष्य मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणे मी माझे कर्तव्य समजतो. याच कर्तव्याच्या जाणिवेतून कोथरुडकरांची विविध दाखल्यांसाठीची फरपट थांबावी यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल १२ डिसेंबर २०२३ पासून माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महा-ईसेवा केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राचा अनेकजण लाभ घेत आहेत.

लेकी या प्रेमाचा, मायेचा अव्याहत वाहणारा निर्मळ झरा आहे. लेकींचे आणि पित्याचे नाते जितके हळवे तितकेच ते जबाबदारीचे आहे. सर्वांचा आदर, सन्मान करणे ही जशी लेकीची जबाबदारी आहे तशीच तिच्या जडणघडणीत कसूर न करणे, लेकीच्या सर्व मनोकामना पूर्ण करणे, तिला अनुरूप स्थळ पाहून तिचे दोनाचे चार हात करून सन्मानपूर्वक पाठवणी करणे ही पित्याची जबाबदारी आहे. पुण्यातील सर्व कन्या या माझ्या लेकी आहेत त्यामुळे विवाह बंधनात अडकणाऱ्या माझ्या लेकींची सन्मानपूर्वक पाठवणी व्हावी यासाठी कन्यादान उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मागील चार वर्षे पुण्यातील माझ्या लेकींना आशीर्वाद देण्याचे भाग्य मला लाभले आहे. पाहूया या उपक्रमाबाबत माझ्या लेकींच्या आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया.

शांतता पुणेकर वाचत आहेत! ज्ञानार्जनाचे सगळ्यात सशक्त माध्यम म्हणजे पुस्तकं! १४ डिसेंबर २०२३, संपूर्ण पुणे शहर आज पुस्तक वाचनात आपला वेळ व्यतीत करत आहे. माझ्या कोथरुड मतदारसंघातील फिरते पुस्तक घर उपक्रम देखील यात सहभागी झाले असून शिवतीर्थानगर मध्ये भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या नेतृत्वात अनेक पुणेकर पुस्तक वाचनात मग्न आहेत.

तेथे कर माझे जुळती! विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथ मेळा आयोजित केला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासा (एनबीटी) च्या वतीने आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवात’ देशभरातील विविध भाषांमधील पुस्तकांची प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. या ग्रंथ मेळ्यामुळे वाचनप्रेमींना एक अनोखी पर्वणीच लाभली आहे. या मेळ्याच्या निमित्ताने एक अनोख्या ठेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. ती ठेव म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद भगतसिंग यांनी कारागृहात लिहिलेली डायरी! ही डायरी म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसमराच्या महायज्ञातील एक ग्रंथच म्हणावा लागेल. या ग्रंथाच्या दर्शनाने अंगावर रोमांच उभे राहिले, क्षणभर भावुक झालो. एका थोर हुतात्म्याच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या डारीच्या दर्शनाने कृतार्थ झालो.

माझ्या कोथरुडमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मोफत फिरते वाचनालय उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमास कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. विशेष म्हणजे कोथरुडमधील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे थांबे वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार श्रद्धेय अटलजींच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मृत्यूंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मरणार्थ दुसरे फिरते पुस्तक वाचनालय आज सुरू केले आहे. माझ्या कोथरूडमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी सुरू केलेला फिरते वाचनालय उपक्रम माझ्या कोथरूडकरांच्या पसंतीस उतरताना पाहून प्रचंड आनंद वाटतो.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीला लाभलेला बहुमूल्य ठेवा म्हणजे आपले गड-किल्ले! या ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, कोथरूड विधानसभा मतदार संघ यांच्या माध्यमातून सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ४.०० वा कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता.

जानेवारी २०२४

 क्रिएटिव्ह फाऊंडेशन, सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून कोथरुड मधील पालकर शाळेस शालोपयोगी वस्तूंचे व क्रीडा साहित्यांचे वाटप केले. दरम्यान, शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, शाळा हे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करून, उत्तम भविष्य घडविणारे केंद्र आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत, यासाठी शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असे उपक्रम राबविले पाहिजेत असे अधोरेखित करून मुलांच्या आवडीनुसार कौशल्य आधारित शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आज स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती! या शुभदिनाचे औचित्य साधून मुकुल माधव फाऊंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना बेंच वाटप केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व जिजाऊ माँसाहेब, तसेच भारताच्या संस्कृतीचा गौरव जगभर वाढविणारे स्वामी विवेकानंद या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांनी आजीवन लढण्याची प्रेरणा दिली, समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. या अनुषंगाने दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आम्ही पाठीशी सदैव राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. या कार्यक्रमास आ. सुनील कांबळे, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी, माजी खासदार प्रदीपदादा रावत, मुकुल माधव फाऊंडेशनचे सचिन कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोथरूडमधील विघ्नहर्ता चौक येथे समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे पाहून आनंद वाटतो. सर्व कोथरूडकर हे माझे कुटूंब आहे, अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याची संधी लाभते हे मी माझे भाग्य समजतो.

आज माझ्या कोथरूड मधील कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन करून त्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अनेक विषयांवर नागरिकांशी सकारात्मक चर्चा केली. दरम्यान अयोध्येत साकार होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराबद्दल तसेच भक्तिमय वातावरणात पार पडत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

हिंदूहृदयसम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व जनाबाई मोकाटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समस्त गावकरी मंडळ कोथरुड परिवाराच्या वतीने महारक्तदान शिबीर आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच, शिबिर सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

माझ्या कोथरुड मधील ५० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप केले. लहानपणी गरिबीचे चटके सोसले आहेत. आम्ही दोघाही भाऊबहिणींनी कष्ट करुन शिक्षण पूर्ण केले असल्याची भावनिक आठवण सांगून अशा कष्टाचे मूल्य अधिक असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष शहर चिटणीस कुलदीप सावळेकर, कोथरूड मंडल सरचिटणीस व महिला आघाडी च्या प्रभारी मंजुश्री खर्डेकर, प्रा. अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, माजी नगरसेविका वासंती जाधव, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, दुष्यंत मोहोळ, अमित तोरडमल यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या खेळाडुंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी राज्यात ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘नमो चषक’ अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असून; या स्पर्धांना खेळाडुंचा लाभणारा प्रतिसाद हा अतिशय उल्लेखनीय आहे.‌ आज माझ्या कोथरुड मध्ये आयोजित मल्लखांब स्पर्धेस भेट देऊन खेळाडुंना प्रोत्साहन दिले. तसेच, सर्व खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील प्रवासाठी शुभेच्छाही दिल्या.

मकर संक्रांतीनिमित्त माझ्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील भगिनींनी करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार समुत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून या सर्व माता भगिनींसाठी आई अंबाबाईच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली. आई अंबाबाईच्या लेकरांना दर्शनासाठी व्यवस्था करून देण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद आणि समाधान वाटते.

फेब्रुवारी २०२४

बाणेरकर तुमच्या उत्साहाला सलाम! भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आपली ही वैभव संपन्न परंपरा ही आपली दौलत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि व्यस्त दिनचर्येमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ घालवणे शक्य होत नाही. म्हणून, माझ्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये ‘नमो करंडका’च्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंब सहभागी होण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत वैभव संपन्न एकत्र कुटुंब परंपरेचे आगळे-वेगळे रुप पाहताना अतिशय आनंद झाला. या फॅमिली वॉकेथॉन मध्ये बाणेरमधील एक अन् एक कुटुंब सहभागी झाले होते. त्यामुळे या स्पर्धेला एकाद्या सोहळ्याचे स्वरूप आले. अगदी अबाल वृद्ध, माता-भगिनी सर्वांनीच वॉकेथॉन मध्ये सहभागी होऊन; कुटुंबाच्या एकीचा आनंद मनमुरादपणे लुटला. या कौटुंबिक कार्यक्रमात दूरध्वनीवरून संवाद साधून बाणेरकरांच्या उत्साहाला अभिवादन केले.
ध्यास विकासाचा, व समाजसेवेचा! आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करून कोथरूड आणि बाणेर मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी आपले शासकीय व सार्वजनिक प्रश्न मांडले. दरम्यान सर्व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जनता दरबारामुळे नागरिकांशी थेट संपर्क होऊन त्यांची कामे मार्गी लागतात तेव्हा अत्यानंद होतो. तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा भाव मनाला समाधान देऊन जातो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून जगण्यासाठी केवळ पैसा नाही तर माणुसकी आणि समाधान तितकंच महत्वाचं आहे याची प्रचिती येते.

कोथरूडकरांच्या समस्या सोडविण्यासाठी माझं जनसंपर्क कार्यालय नेहमीच कार्यतत्पर असते. शैक्षणिक तथा इतर कामांसाठी अत्यावश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले कोथरूडकरांना सहज उपलब्ध व्हावेत यासाठी मोफत महा ई-सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या महा ई-सेवा केंद्राचा कोथरुडकरांना मोठा लाभ होत आहे. दरम्यान यापैकी काही नागरिकांचे विविध प्रकारचे दाखले तयार झाले असून, त्या लाभार्थ्यांना त्यांचे दाखले वितरित केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून काम करण्यास अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.

आजच्या व्यस्त दिनचर्येमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ घालवता यावा या उद्देशाने माझ्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंबासाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या फॅमिली वॉकेथॉन मध्ये बाणेरमधील अनेक कुटुंबांचा सहभाग लाभला होता. यात आगदी अबाल वृद्ध ते माता – भगिनींपासून सर्वच सहभागी झाले होते, त्यामुळे ही स्पर्धा एखाद्या सोहळ्याप्रमाणे पार पडली. यावेळी टिपलेले काही अविस्मरणीय क्षण !

जय श्रीराम! तब्बल ५०० वर्ष रामभक्तांच्या साधनेमुळे २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांचे आगमन झाले. यानुषंगाने माझ्यासह प्रत्येकालाच प्रभू रामल्लांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. म्हणूनच, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यातील रामभक्तांसाठी भारतीय जनता पक्षाने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यानुसार, पुण्यातून आस्था ट्रेनने अयोध्येकडे प्रयाण केले. याप्रसंगी पुणे रेल्वे स्थानक येथे उपस्थित राहून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. वास्तविक आपल्याकडे ज्याप्रमाणे आषाढी-कार्तिकीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली असते तशीच ओढ पुण्यातून अयोध्येकडे जाणाऱ्या रामभक्तांमध्ये होती. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आपण भक्तीभावाने नमस्कार करतो तशीच भावना अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक रामभक्तांप्रती होती. त्यामुळे आज सर्व रामभक्तांना नमस्कार करुन आमचा ही नमस्कार प्रभू श्रीरामांच्या चरणी पोहोचवावा. तसेच, रामल्लांच्या दर्शनाचा योग माझ्या सारख्या अन्य ही रामभक्तांना लवकरच घडावा, अशी प्रार्थना याप्रसंगी केली.

गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आज पुणे जिल्ह्यातील नाणेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेस सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांचे शब्द भंडार वृद्धिंगत व्हावे या हेतूने शाळेस गोष्टींची पुस्तके भेट दिली. तसेच यावेळी उत्सुकतेने विद्यार्थ्यांच्या बाजूला बसून त्यांचे वाचन घेतले व भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्व अधोरेखित करून त्यांना मार्गदर्शन केले.

जळगावचं आणि माझं वेगळं नातं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कामासाठी कार्यकर्ता म्हणून घर सोडले, तेव्हा सर्वात पहिल्यांदा मला जळगाव हे कार्यक्षेत्र मिळाले मिळाले होते. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुन्या आठवणींशी मी आजही जोडलेलो आहे. अभाविपचं काम करत असताना शिवाजीनगर मधील ज्या वाड्यात रहायचो, त्या वाड्याचा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात आला आहे‌. या ठिकाणी कै. हरिभाऊ तथा अन्नपूर्णा भिरुड बालभवन उभारण्यात आले आहे. वास्तविक, रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी समतोल प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव मध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता या उपक्रमातील मुलांना या वास्तूचा आधार मिळाला आहे. या उपक्रमास समाजातील इतरही नागरिकांनी मदत केली पाहिजे, अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दिलीप चोपडा, समतोल प्रकल्पाचे प्रमुख राहुल पवार, डॉ. सुरेंद्र भिरुड यांच्यासह संघ परिवारातील इतर मान्यवर आणि विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुने सहकारी उपस्थित होते.

जळगांव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे मुलींच्या वसतिगृहात विविध उपकरणांनी सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. यासह धकाधकीच्या जीवनात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या फिटनेस व आरोग्याकडे लक्ष देता यावे यासाठी खुल्या मैदानात व्यायामशाळा (Green Gym) सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही व्यायाम शाळांचे उ‌द्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री भरतदादा अमळकर व शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या संस्थेचे माजी विद्यार्थी व उ‌द्योजक श्री. सुनील बढे उपस्थित होते.

संकल्प मोतिबिंदूमुक्त कोथरुडचा…! डोळे हा आपल्या शरिरातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे उतारवयात याला मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. या आजारापासून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, याचा मोठा खर्च असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठांना हा खर्च करणे अवघड ठरते. या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबावरचा हा ताण कमी करण्यासाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा कोथरुडकर मोठा संख्येने लाभ घेत असल्याचे पाहून आनंद वाटतो.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापराक्रमामुळे महाराष्‍ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. हे गड किल्ले आपल्या अस्मितेची ओळख आहेत. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व्हावी, या हेतूने दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्याची सहल घडविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, आज लोहगडसाठी कोथरुड मधील बाल मित्र रवाना झाले. यावेळी उपस्थित राहून या बाल मित्रांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या पुढाकारामुळे भावी पिढीमध्ये गड किल्ले यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

“नमो चषक २०२४” अंतर्गत दि १४ आणि १५ फेब्रुवारी अशी दोन दिवसीय “भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा” आयोजित केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नवोदित खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेस पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दक्षिण मंडलाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका प्रीतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, उपाध्यक्ष भा.ज.पा. गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, आकाश दादा बालवडकर, मयुरेश बालवडकर, सचिन दळवी, प्रमोद कांबळे, सरचिटणीस कोथरूड दक्षिण मंडल दीपक पवार, गिरीश खत्री आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर मंडल युवा मोर्चाचे सरचिटणीस निलेश सायकर, कोथरूड युवा मोर्चाचे सरचिटणीस सोहम मुरकुटे, कोथरूड युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कौशल टंकसाळी व अवधूत गायकवाड यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

जय शिवाजी, जय भवानी ! महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने शिवजयंतीचे औचित्य साधत लहान मुलांना शिवरायांच्या युद्धनीतीची ओळख व्हावी यासाठी भाजपा कोथरुड मंडल ‘नमो चषक’च्या माध्यमातून कोथरुड मतदारसंघात लाठी-काठी आणि मर्दानी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी खेळाडुंनी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. ही सर्व प्रात्यक्षिके पाहून बालमित्रांचा अभिमान वाटला. एवढ्या लहान वयात देखील त्यांच्या अंगातील हे कसब कौतुकास्पद आहे.

बालवय हे संस्कारक्षम असते. या बाल वयातच विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे ग्रंथ वाचण्यास मिळाले, तर त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. त्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू करताना मला प्रचंड आनंद होत आहे. प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते कोथरुडमधील अभिनव स्कूल येथे या फिरत्या बाल बाचनालयाचे लोकार्पण केले. टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेम अशा विविध अत्याधुनिक साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी कमी होत असल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे, अवांतर विषयांच्या पुस्तक वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी विद्यार्थ्यांना हा उपक्रम नक्कीच लाभदायक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. बाल वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी मित्र, शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन पिढीला पुस्तकांमधील साहित्याच्या सानिध्यात आणण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू केले. या वाचनालयाचे लोकार्पण करताना लाभलेला आनंद अवर्णनीय आहे. या पुढाकारमुळे नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजून त्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास वाटतो. पाहूया बाल वाचनालय लोकार्पण सोहळ्या दरम्यान टिपलेले काही क्षणचित्रे!

स्वामी विवेकानंद म्हणतात, “जीवनात आनंद शोधताना खरा आनंद कष्टाचा असतो.” आपली समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा याचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारे हे हात आपल्या समाजाचे विश्वकर्मा आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात हे विश्वकर्मा अनेकदा सकाळी उठल्यावर वेळेअभावी घोटभर पाणी पिऊन उपाशीपोटी कामाला सुरुवात करतात. मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा असल्याने; माझ्या आई-वडिलांनी आमचे पालनपोषण करताना कशाप्रकारे पोटाला तोशीश सहन केली, हे लहानपणापासून अनुभवले आहे. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी यासाठी कोथरुडमध्ये ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम सुरू करताना प्रचंड आनंद होत आहे. वास्तविक, दुसऱ्याचे दुःख आपल्या हृदयात सामील करून त्याच्यावर उपाय शोधत राहिलो; तर आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली याचे मनाला वेगळेच समाधान देणारे आहे.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये सांगितले आहे की, ‘जो जे वांछिल तो ते लाहो…’ म्हणजे सर्वांच्या मंगलइच्छा पूर्ण होवोत. कोथरुड मधील प्रत्येक नागरिकांना इच्छित सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. यातीलच एक उपक्रम म्हणजे कोथरूडकरांना रेशन कार्ड मिळवून देणे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाच्या वतीने धान्य मिळत असते. मात्र, अनेकांचे रेशनकार्ड बंद असल्याने किंवा काही त्रुटींमुळे रेशनच्या दुकानातून धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी गेल्या वर्षभरापासून मोफत रेशनकार्ड दुरुस्ती केंद्र सुरू केले आहे. याचा अनेकांना लाभ होत आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने; कोथरुडकरांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी रेशनकार्ड सुरू होईपर्यंत लोकसहभागातून धान्य उपलब्ध करून दिले आहे.

राज्यातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, राज्यासह देशाला उदयोन्मुख प्रतिभाशाली खेळाडू मिळावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत माझ्या कोथरुड मतदारसंघातील पटवर्धन बाग येथे आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडुंना प्रोत्साहन दिले.

तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘नमो चषक २०२४’ अंतर्गत कोथरुड श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार अतिशय उपयुक्त असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

पुस्तकं ही मानवाची परम मित्र आहेत. पुस्तके प्रसंगी मार्गदाते बनून आयुष्यात सुखी होण्याचे मार्गदर्शन करतात. तरूणाईमध्ये वाचनाची गोडी वाढावी, यासाठी कोथरूडमध्ये फिरते वाचनालय सूरू केले आहे. यात मराठी पुस्तकांचा खजिना असंख्य वाचनप्रेमींना भुरळ घालतो आहे. या उपक्रमाचा लाभ कोथरूडकर घेत असल्याचे पाहून आनंद वाटतो. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पाहुया या उपक्रमाबद्दल कोथरूडकरांच्या प्रतिक्रिया!

मार्च २०२४

माझ्या कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांना काही क्षण विसाव्याचे अनुभवता यावे, समवयस्कर जेष्ठ बांधवांच्या भेटीगाठी व्हाव्या यासाठी “निसर्गछाया” हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक कोथरूडकर आणि लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.

लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या एकत्रित आयुष्याची नवीन सुरुवात, कुटुंबात असणारी लगबग, खरेदी आणि बरंच काही. या समारंभाच्या निमित्ताने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि मुलीच्या घरच्यांना तिची सन्मानाने पाठवणी करता, यावी यासाठी माझ्या कोथरुड मतदारसंघात कन्यादान उपक्रम राबवित आहे. यामुळे माझ्या कोथरुड मधील लेकींच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिबिंब उमटताना पाहून एक वेगळीच ऊर्जा मिळते. लग्नाच्या खर्चात हातभार लागल्याने अनेक कुटुंब समाधान व्यक्त करत आहेत. माझ्या कोथरुड मधील कर्वेनगर भागातील प्रियंका फासाटे ही आमची लेक लवकरच वैवाहिक जीवनास सुरुवात करत आहे. त्यामुळे तिला तिच्या वैवाहिक जीवनात कशाचीही कमतरता भासू नये, म्हणून संसारोपयोगी वस्तू आणि साडी देऊन तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान लाभले.

डोळे हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. दृष्टी असेल तरच सृष्टी पाहणे शक्य होते, म्हणून, मोतीबिंदू कोथरुड संकल्पांतर्गत कोथरुडमधील अनेकांवर लोकसहभागातून शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चष्मा देऊन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचा माझ्या कोथरूडकरांना लाभ झाल्याचे समाधान वाटते

मानवी जीवनात सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेवेमुळे मानवी जीवनात परिपूर्णता येते. याच भावनेतून माझ्या कोथरुड मतदारसंघातील श्रमिक बांधवांच्या सेवेकरिता प्रेमाची न्याहारी हा उपक्रम सुरू केला आहे. स्वतः उपस्थित राहून श्रमिक बांधवांना न्याहारी वाटप केली, तसेच त्यांच्या सोबत न्याहारीचा आस्वादही घेतला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकल्प सामाजिक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक महिला बचतगटाच्या माध्यमातून वैयक्तिक तथा सामूहिक नृत्य स्पर्धा व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. यावेळी माजी नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कोथरूडमधील कष्टकरी श्रमिक बांधवांना देवदर्शनासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला. त्यानुसार पुण्याजवळील श्रीदत्त महाराजांचे पवित्र स्थान असणाऱ्या नारायणगाव येथे जाण्यासाठी विशेष गाडी रवाना झाली. या गाडीने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे ऊर्जादायी होते. दर गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ही बस पुण्याहून सुटेल.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी काश्मीरमधील 370 कलम हटविण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण केले.

हे कलम रद्द करणे जणू एका क्रांतीचा आरंभच होता! कलम रद्द करताना अनेकदा विरोध, संघर्ष झाला, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. या सर्व बाबी ‘ आर्टिकल 370″ या चित्रपटातून अतिशय रंजक पद्धतीने पडद्यावर मांडल्या आहेत. हे सर्व माझ्या बाणेर- बालेवाडी भागातील नागरिकांना अनुभवता यावे यासाठी “आर्टिकल 370” या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले होते.

कोथरूड मधील माता भगिनी स्वावलंबी व्हाव्या यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या जाणिवेतून माझ्या कोथरूड मतदारसंघात विविध उपक्रम राबवित आहे. आजपर्यंत असंख्य महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे; ही बाब सुखवणारी आहे. आज पुन्हा ५० महिलांना समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिलाई मशीन देऊन त्यांना प्रोत्साहन देताना आनंद वाटला. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होतील, याचा मला ठाम विश्वास वाटतो.

२०२०

२०२१

२०२२

२०२३

२०२४