जळगाव जिल्हयातील विविध कामांचा घेतला मंत्रालयात आढावा

जळगाव जिल्हयातील प्रलंबित विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री तथा जळगांवचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. या बैठीकीमध्ये जळगांव महानगरपालिकेने घेतलेल्या हुडको कर्जाबाबत, २५ कोटी विशेष निधीबाबत, अमृत अभियान पाणी-पुरवठा योजना, अमृत मल-निस्सारण योजना, बोधवड नगर पंचायतीचे प्रश्न, जळगाव महानगर पालिकेतील विविध रिक्त पदे भरणे, जळगांव जिल्हयातील पाणी-टंचाई, मेहरुण तलाव सुशोभिकरण, जळगांव – भुसावळ तिसरी रेल्वे लाईन, महसूल विभागातील विविध रिक्त पदे भरणे, जामनेर, यावल, चोपडा, भुसावळ, जळगांव येथील नवीन प्रशासकीय इमारती बांधणे, चाळीसगांव येथे सा.बां. विभागाची जागा शिव-स्मारकासाठी देणे, शिवाजी नगर व प्रिप्रांळा येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे, जळगांव जिल्हयात पशुवैद्यकीय विद्यालय बांधणे, लिंबू वर्गीय फळांचे संशोधन केंद्र चाळीसगांव येथे उभारणे, इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
जळगांव जिल्हयात कमी पाऊस झाल्यामुळे ३० सप्टेंबर नंतर टंचाई परिस्थितीस मुदतवाढ देण्यात आली. २५ कोटी विशेष निधी स्थानिक पातळीवर समन्वयाने खर्च करण्याबाबत निर्देश दिलेत, पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना यांचे कार्यारंभ आदेश त्वरीत देऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करणे, मेहरुण तलाव सुशोभिकरण प्रस्ताव टप्प्या-टप्प्याने सादर करणे, महानगर पालिकेची रिक्त पदे भरणे, याबाबत चर्चा झाली.
या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार सर्वश्री एकनाथ खडसे, राजूमामा भोळे, श्रीमती स्मिताताई वाघ, उन्मेष पाटील, हरीभाऊ जावळे, ललित कोल्हे, महापौर, नितिन लढ्ढा, माजी महापौर, रमेश जैन, सभागृह नेते, किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी तसेच कौस्तुभ दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हजर होते.