संघाच्या दैनंदिन शाखेतून व अन्य कार्यक्रमांतून स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव, समाजाविषयी संवेदना, सेवाभाव, समानुभूती, कर्तव्यभाव जागृत होतो. त्यामुळे असे संघाच्या मुशीतून घडलेले स्वयंसेवक सामाज आणि राष्ट्रकार्यासाठी सदैव तत्पर असतात. चंद्रकांतदादांची देखील याच मुशीतून जडण घडण झालेली आहे.
अभाविपच्या कार्यकाळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समरसता रुजविण्यासाठी आणि स्वा.सावरकरांच्या सामाजिक कार्याची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी समताज्योत यात्रेचे आयोजन करून महाराष्ट्रभर सामाजिक अभिसरणाचे त्यांनी नेतृत्व केले. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याच्या अभियानात सिंहाचा वाटा दादांचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन त्यांच्या मराठवाड्यातील शैक्षणिक कार्यास अभिवादन करण्यासाठी समाजामध्ये कटू भावना निर्माण होऊ न देता सर्व समाजाला समान पातळीवर आणून सामंजस्य निर्माण करून अत्यंत शांतीपूर्ण वातावरणात हा नामविस्तार कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती.