कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 वरुन रु.1 हजार, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन रु. 1 हजार प्रति तास, शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 वरुन रु.1 हजार प्रति तास, उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1 हजार वरुन रु. 1 500 रुपये प्रति तास,पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 वरुन रु. 1 हजार प्रति तास,पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास, उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1500 प्रति तास, कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता, सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पद भरण्यास मान्यता देण्यात आली.सहायक प्राध्यापक २ हजार ८८ पद भरती करण्यास मान्यता, प्राचार्य १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यास मान्यता,ग्रंथपाल – १२१ व शारिरीक शिक्षण संचालक – १०२ असे एकुण २२३ पदे भरण्यास मान्यता.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे.,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर.,शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था,अमरावती.,कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे;गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर,डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई.लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर. या संस्थांना अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारकडून जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी देशातील साधारणत: १५० ते १७५ पदवी संस्था आणि १०० पदविका संस्थांची निवड प्रकल्पाच्या निकषांच्या आधारे केंद्र व राज्याद्वारे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण रु. ४ हजार २०० कोटी इतक्या निधीचा असून प्रकल्प कालावधी ५ वर्ष आहे. प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक पदवी संस्थेला १० कोटी तर पदविका संस्थेला प्रत्येकी ५ कोटी रुपये असे अनुदान प्रकल्प कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता दिली आहे. नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता टप्प्या टप्प्याने एकूण ६५ शिक्षकीय व ५० शिक्षेकत्तर अशा एकूण ११५ पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण रु.२२१.४८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. या महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अॅन्ड डाटा सायन्स, मेकॅनिकल अॅन्ड ऑटोमेशन इंजिनिअरींग,कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग ही अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठांत जेष्ठ मार्गदर्शक प्रा. कै.बाळासाहेब आपटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याची या अध्यासनासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या अध्यासनासाठी आवश्यक त्या निधीची उपलब्धता आणि पद निर्मीती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना आहे. अभिमत विद्यापीठांकरीता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे २१ अभिमत विद्यापीठातील १४ हजार २३२ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे
रोजगारभिमुख आणि कौशल्यआधारीत अभ्यासक्रम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात आले असून एसएनडीटी विद्यापीठाने महिलांना सक्षम करण्यात महत्वाची भूमिका केली असून दुर्गम भागातील हे केंद्र महिलांना आर्थिकदृष्टया आणि शैक्षणिकदृष्टया सक्षम करण्यासाठी महत्वाचे ठरेल.
सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया आणि अक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या तांत्रिक सहाय्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफ मुंबई यांनी एकत्र येऊन या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या अभ्यासक्रम विनामूल्य असून इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफने एकत्र येऊन १३ जिल्ह्यांतील, ६ विद्यापीठांतील ३,हजार महाविद्यालयातील विद्यार्थी जोडतील या कार्यक्रमा दरम्यान, ६,२०० हून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि ३,००० महाविद्यालयांमध्ये ‘ग्रीन क्लब’ तयार करून अध्यापन सामग्री तयार करणं, जलसंधारण उपक्रमांबद्दल अल्पकालीन मोहिमांचं प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले जातील. पर्यावरणविषयक कौशल्यं, उद्योजकता हे सुद्धा ग्रीन क्लब अंतर्गत उपक्रमांचा एक भाग आहे. त्यात तरुणांना पाण्याची बचत करण्यासंबंधी सात उपाययोजना शिकवल्या जातील ज्यामुळे पुढील ३ वर्षांमध्ये महाविद्यालयांमध्ये ४३ दशलक्ष घन लिटर पाण्याची बचत होईल.