कुशल संघटक

सन १९८० ते १९८३ या तीन वर्षांत जळगाव जिल्ह्यात त्यांनी अभाविपचा उत्तम संघटनात्मक विस्तार केला. त्यानंतर ते अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री झाले. १९८८-८९ हे वर्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संघर्षपर्व जाहीर केले. राज्यस्तरापासून शाखा स्तरापर्यंत केवळ महाविद्यालयातील निवडणुकांच नव्हे, तर कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्रिय केले. त्यामुळे अभाविपच्या अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठांचे नेतृत्व/ प्रतिनिधित्व केले. देशभर गाजलेली मुंबई विद्यापीठाची निवडणूक दादांच्या कुशल रणनीतीमुळे अविस्मरणीय ठरली, आणि प्रथम मुंबई विद्यापीठावर अभाविप चे प्राबल्य निर्माण झाले.
या संघर्षपर्वातच (चंद्रकांतदादा पाटील) त्यांनी ‘कॅम्पस कल्चर’ हा नवा आयाम अभाविपला दिला. याशिवाय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासोबतच त्यांनी अन्य रचनात्मक कार्यक्रमांद्वारे उपक्रमशीलतेवर खूप भर दिला. डिप्लोमा एक्झिबिशन (DIPEX), तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषद (TSVP), कृषिशिक्षण विद्यार्थी परिषद (KSVP) यांसारखे नवनवीन आयामही याच काळात विकसित झाले. प्रत्येक आयामांसाठी समर्थ आणि सक्षम कार्यकर्ते चंद्रकांतदादांनी उभे केले.
सन १९९०-९४ या कालावधीत त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताना दादांनी पूर्वोत्तर राज्यातील ‘आंतर छात्र जीवन दर्शन’ (SEIL) Students Experience Interstate Living. या प्रकल्पाला आगळेवेगळे स्थान प्राप्त करून दिले. सन १९९० मध्ये अभाविपच्या वतीने काश्मीर प्रश्नावर देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ‘चलो काश्मीर’ नावाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गतच सुमारे २० हजार तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाण्याची योजना बनली. या मोहिमेचे नेतृत्व मा. चंद्रकांतदादा करत होते. या मोहिमेंतर्गत तरुणांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ठिकठिकाणी मान्यवरांची भाषणे होत होती. या माध्यमातून हे मान्यवर काश्मीरमधील भीषण परिस्थितीचे वास्तव मांडत होते. या सर्व तरुणांनी श्रीनगरकडे कूच केल्यानंतर त्यांना उधमपूर येथे अटक करण्यात आली व दुसऱ्या दिवशी सुटका झाल्यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांनी आपला मोर्चा राजधानी दिल्लीकडे वळवला. राजधानी दिल्लीत इंडिया गेट जवळ आंदोलन सुरू केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान मा. व्ही. पी. सिंह यांनी या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यास भाग पाडले गेले.
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत सखोल चर्चेनंतर चंद्रकांतदादांनी आपल्याकडील तिरंगा पंतप्रधान सिंह यांना देऊन; तो श्रीनगरमधील लाल चौकात फडकवण्याची विनंती केली, मनात काश्मीर प्रश्नाची धगधगती मशाल ठेवून सर्व कार्यकर्ते विद्यार्थी तत्सम दिल्लीहून आपापल्या स्थानी परतले.
अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम थांबवल्यानंतर मा. चंद्रकातंदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. सन १९९५-१९९९ या कालावधीत त्यांच्याकडे रा. स्व. संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विभाग सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. सन १९९९-२००४ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती. सतत १३ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करणारे चंद्रकांतदादा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचे जानेवारी १९९४ ते एप्रिल २००० पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते. तर एप्रिल २००० ते मार्च २०१३ पर्यंत दादांकडे म्हाळगी प्रबोधिनीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.