व्यक्तिमत्व
ओळख

श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सलग तेरा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. अभाविपमध्ये कार्यरत असताना त्यांना यशवंतराव केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासामुळेच जनसेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनी निर्माण झाली. उत्तम संघटन कौशल्य आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या वृत्तीमुळेच संघटनेने त्यांच्यावर परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवला. देशाच्या विकासाची धुरा देशाच्या तरुण पिढीच्या हातात आहे, हे ओळखून त्यांनी युवकांना राजकीय आणि सामाजिक सेवेत आपले योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले. भाजपाने संघटनात्मक कार्याची जबाबदारी दिल्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी नियोजनबद्धरीत्या पक्षाचा पाया विस्तारला.

अधिक पहा
Chandrakant (Dada) Patil
Border-img

आमचे कार्य

Border-img

गॅलरी